शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेचा कळस! हत्येनंतर चार दिवस करत होता मृतदेहाचे तुकडे; म्हणे, सरस्वतीने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 06:08 IST

घरात प्रवेश करताच पोलिसांचा उडाला थरकाप.

लोकमत न्यूज नेटवर्क,  ठाणे : गेल्या १० वर्षांपासून सरस्वती वैद्य (३२) हिच्याबरोबर एकत्रित राहणाऱ्या मनोज साने (५६) याने तिची निर्घृणपणे हत्या केली. कहर म्हणजे हत्येनंतर सलग चार दिवस तो तिच्या मृतदेहाचे तुकडे करीत होता, अशी माहिती नयानगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दिली. न्यायालयाने १६ जूनपर्यंत त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश गुरुवारी दिले. 

बोरिवलीमध्ये शिधा वाटप केंद्राचे दुकान सांभाळणाऱ्या मनोजची सरस्वतीबरोबर २०१४ मध्ये ओळख झाली. ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनाही आई-वडील नाहीत. गेल्या १० वर्षांपासून ते एकत्र वास्तव्याला असले, तरी त्यांचे लग्न झालेले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. याच भांडणातून अखेर मनोजने ४ जून २०२३ राेजी तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी तो तिच्या मृतदेहाचे रोजच लहान लहान तुकडे करीत होता.   

म्हणे, सरस्वतीने केली आत्महत्या  

सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूचे खापर आपल्या डोक्यावर येईल, म्हणून घाबरून पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचे मनोजने म्हटले आहे. मनोज आणि सरस्वती यांच्यातील भांडणाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याने सरस्वतीची हत्या केली का? की त्याने सांगितल्यानुसार तिने आत्महत्या केली का? याचा तपास पोलिस करत आहेत.

घरात प्रवेश करताच उडाला थरकाप   

- पोलिसांनी इतर रहिवाशांच्या मदतीने फ्लॅटचे टाळे तोडून घरात प्रवेश केला तेव्हा आतील चित्र थरकाप उडविणारे होते. 

- बेडरूममध्ये काळ्या रंगाचे प्लास्टिक व रक्त लागलेली एक इलेक्ट्रिकल सॉ मशीन आढळली. किचनच्या फरशीवर डोक्यापासून कापलेले केस वेणीसह दिसून आले. 

- कूकरमध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केलेले मांस शिजवलेले होते. पातेल्यात शिजवलेले तुकडे दिसत होते. 

- वॉश बेसिनमध्ये एका प्लास्टिक बकेटमध्ये हाडे आणि अर्धवट जळालेले मांसाचे तुकडे ठेवलेले होते. मृतदेहाचे घरात मिळालेले तुकडे गोळा करून पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात पाठविले आहेत.

 

टॅग्स :Mira Road Murderमीरा रोडCrime Newsगुन्हेगारी