शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा गाळ्यांवर सुनावणी

By admin | Updated: March 26, 2017 04:21 IST

कल्याण -बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा उभारण्यात आलेल्या

अंबरनाथ : कल्याण -बदलापूर रस्त्याला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाच्या जागेवर बेकायदा उभारण्यात आलेल्या ४५ गाळ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. याच बेकायदा बांधकाम प्रकरणात महसूलमंत्र्यांनी स्थगिती आदेश उठवत या दुकानांवरील कारवाईचा मार्ग खुला केला होता. मात्र, आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ही कारवाई लांबणीवर टाकली आहे. कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाला लागून असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाला राज्य सरकारने शेती विषय शिकवण्यासाठी जागा दिली होती. मात्र, शाळेत शेती हा विषय बंद पडल्याने ही जागा पडीक होती. या जागेचा गैरवापर करत काही व्यापाऱ्यांनी या जागेवर ४५ दुकाने उभारून ही जागा हडप केली होती. या दुकानांची तक्रार शैकत शेख यांनी जिल्हाधिकारी आणि नंतर राज्य सरकारकडे केली होती. न्याय न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने यासंदर्भात मंत्रालयात महसूल मंत्र्यांकडे सुनावणी घेऊन हा प्रश्न सोडवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी सुनावणी घेत या कारवाईला देण्यात आलेली स्थगिती उठवली. बांधकामावरील स्थगिती उठवल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानुसार, या दुकानांवर पालिका आणि तहसीलदारांकडून कारवाई करण्यात येणार होती. मात्र, या दुकानदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)