भिवंडीत ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:09 AM2019-08-10T00:09:55+5:302019-08-10T00:10:03+5:30

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात ...

Heaps of rubbish dumped in the ground | भिवंडीत ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

भिवंडीत ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

Next

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कचराकुंडीमध्ये जमा झालेला कचरा रस्त्यावर पसरला आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर अनेक ठिकाणी जंतुनाशक पावडर किंवा औषध फवारणी होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.

कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत असताना शहरात असे चित्र आहे. अभियानाच्या सुरूवातीच्यावर्षी फक्त बक्षिसाची ५० लाखांची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने आटापिटा केला. मात्र त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्रीपत तांबे यांनी केली आहे. तसेच कचरा न उचलता पालिकेच्या लेखाधिकारी विभागाकडून काढण्यात येणारे कंत्राटदारांचे धनादेश तात्काळ रोखण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील विविध भागात गटार नाल्याचे व भुयारी गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या दुर्गंधीमुळे बाजारहाट करण्यासाठी येणाºया महिला व नागरिकांची गैरसोय होत आहे. कुंडीतील कचरा घंटागाडीतून नियमित उचलून डम्पिंग ग्राऊंडवर टाकणे आवश्यक आहे. असे असताना प्रभूआळी, बीजेपी दवाखाना,जैन मंदिर, बंगालपुरा, शिवाजीनगर, शांतीनगर, ईदगारोड, दर्गारोड, कल्याणरोड, शास्त्रीनगर, पद्मानगर,अंजूरफाटा ,गैबीनगर, म्हाडा कॉलनी,गायत्रीनगर, न्यू - आझादनगर अशा पालिकेच्या पाचही प्रभागात कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

Web Title: Heaps of rubbish dumped in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.