आरोग्यमंत्र्यांनी केले कोरडेच सांत्वन!

By Admin | Updated: September 14, 2016 04:18 IST2016-09-14T04:18:41+5:302016-09-14T04:18:41+5:30

आज सकाळी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणाचे बळी ठरलेल्या बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कोरडे सांत्वन केले

Health minister made comfort | आरोग्यमंत्र्यांनी केले कोरडेच सांत्वन!

आरोग्यमंत्र्यांनी केले कोरडेच सांत्वन!

रविंद्र साळवे , मोखाडा
आज सकाळी आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मोखड्यातील कळमवाडी येथील सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा या कुपोषणाचे बळी ठरलेल्या बालकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन कोरडे सांत्वन केले. परंतु कोणत्याही प्रकारची मदत त्यांनी या कुटुंबाला केलेली नाही. पालकमंत्री आणि आदीवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आजही याबाबत मौन पाळणेच पसंत केले.
मोखाड्यातील कुपोषणाचे भीषण वास्तव मांडणारे घणाघाती वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर सर्वत्र टीका होऊ लागल्याने आज आरोग्य मंत्र्यांनी या कुपोषित भागाचा अचानक दौरा केला. गेल्या अनेक दिवसांपासून लोकमतने कुपोषण भूकबळी व याकडे प्रशासनाने केले दुर्लक्ष यावर सडेतोडपणे लिखाण करून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले त्याची दखल घेऊन आरोग्य मंत्र्यांनी हा दौरा केला.
या कुटुंबाशी साधलेल्या संवादातून अनेक समस्या समोर आल्या व त्यांना जॉबकार्ड नसल्याचे निदर्शनास आले असून त्यांना तात्काळ रोजगार उपलब्ध करण्यात यावा याबाबत आदेश देण्यात आले.
कुपोषितग्रस्त शिरसोन पाडा पुन्हा दत्तक घेण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या शिरसोनपाड्याच्या रस्त्यासाठी १५ लाख देण्यात आले असल्याचे सांगितले. मंत्रीमहोदयांसोबत जिल्हा अधिकारी अभिजित बांगर जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी गायकवाड परिषद सदस्य प्रकाश निकम अमोल पाटील आणि मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते .

Web Title: Health minister made comfort