शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या छळवणुकीमुळे त्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: November 13, 2016 02:59 IST

राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी (५०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी स्वत:ला पेटवून घेण्यापूर्वीच

ठाणे : राबोडीतील रहिवासी अब्दुल काझी (५०) यांनी शनिवारी सकाळी राहत्या इमारतीच्या गच्चीवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. काझी यांनी स्वत:ला पेटवून घेण्यापूर्वीच त्यांच्या मित्राने त्यांच्या हातातील मशाल खेचून घेतल्याने ते बचावले. हा प्रकार करण्यापूर्वी काझी यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये नगरसेवक नजीब मुल्ला यांना जबाबदार धरले. मात्र, मुल्ला यांनी हे आरोप फेटाळून लावले. काझी यांच्या मालकीची राबोडीत १४ खोल्यांची चाळ आहे. या चाळीत ७० रुपये भाडे देऊन १४ भाडोत्री राहतात. काझी यांनी २० वर्षांपूर्वी ही चाळ विकत घेतली. चाळमालकाची पूर्वपरवानगी न घेता भाडोत्री वाढीव बांधकाम करीत असल्याने त्याविरोधात कोर्टात केस सुरू आहे. कोर्टाने मालकालाच दुरुस्ती करण्याची परवानगी दिली असल्याचे काझींचे म्हणणे आहे. परंतु, स्थानिक नगरसेवक नजीब मुल्ला हेही जागा विकसित करण्यासाठी त्यांनी पाठवलेल्या बिल्डरशी करार करण्याकरिता दबाव आणत असल्याचा आरोप काझी यांनी केला आहे. मागील १० वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत, पोलीस ठाण्यात शुक्रवारी फोनवरून कळवले होते. मात्र, तक्रारीची दखल न घेतल्याने शनिवारी या वारंवारच्या त्रासाला कंटाळून हा मार्ग स्वीकारल्याचे काझींचे म्हणणे आहे. काझी यांना राबोडी पोलिसांनी सिव्हील रुग्णालयात दाखल केले आहे.नगरसेवक मुल्ला हे यापूर्वी सुरज परमार प्रकरणात अटकेत होते. सध्या त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. (प्रतिनिधी)काझी हे त्या ठिकाणी अनधिकृतपणे तळ अधिक दोन मजल्यांची इमारत बांधणार होते. येथील भाडेकरूंनी पालिकेकडे रीतसर अर्ज करून धोकादायक घरांच्या दुरुस्तीची परवानगी मागितली होती. पालिकेने परवानगी दिली होती. परंतु, काझींनी ही परवानगी रद्द करण्याची मागणी करून मलाच या ठिकाणी इमारत बांधण्यासाठी परवानगी द्यावी, असा हट्ट धरला होता. माझी मागणी मान्य केली नाही, तर मी जीवाचे बरेवाईट करून घेईन आणि तुमची नावे लिहून ठेवीन, अशी धमकीही दिली होती. शनिवारी सकाळी येथील महिलांनी राबोडी पोलीस ठाण्यात काझींच्या विरोधात एनसीदेखील नोंदवली आहे. मी केवळ अनधिकृत बांधकामालाच विरोध केल्याने त्याने सुसाइड नोटमध्ये माझे नाव घेतले असावे. - नजीब मुल्ला, नगरसेवक