घरातून सोन्या-चांदीचे दागिने चाेरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST2021-09-19T04:40:44+5:302021-09-19T04:40:44+5:30

ठाणे : कळवा, खारेगाव भागातील नथाराम राठोड (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी ८३ हजार ५०० रुपयांचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरल्याची घटना ...

He stole gold and silver ornaments from the house | घरातून सोन्या-चांदीचे दागिने चाेरीला

घरातून सोन्या-चांदीचे दागिने चाेरीला

ठाणे : कळवा, खारेगाव भागातील नथाराम राठोड (३०) यांच्या घरातून चोरट्यांनी ८३ हजार ५०० रुपयांचे साेन्या-चांदीचे दागिने चाेरल्याची घटना २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत घडली. याप्रकरणी शुक्रवारी कळवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसागर इमारतीतील राठोड यांच्या खोली क्रमांक १०६ येथे राहणारे कुटुंबीय काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी २ सप्टेंबरलस दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान त्यांच्या बंद घराची कडी उचकटून कुलूप तोडून कपाटातील ४५ हजारांचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र, १५ हजारांची सोनसाखळी आणि इतर दागिने, असा एकूण ८३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी राठोड यांनी १७ सप्टेंबरला कळवा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्वेता चव्हाण याप्रकरणी तपास करीत आहेत.

................................

Web Title: He stole gold and silver ornaments from the house