शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

मोलकरणीस साक्षर करून त्यांनी दिली नवी ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 01:03 IST

‘मला कीर्तनाची आवड आहे. मी कीर्तन करायला जाते. परंतु, मी जे कीर्तन करते, ते मला वाचता यावे. मला ते शब्द बोलता येण्याबरोबरच, वाचता यावे’, अशा शब्दांत विमलमावशींनी त्यांची लिहिण्यावाचण्याची आवड बोलून दाखवली आणि त्या दिवसापासून संध्याताई सावंत यांच्या शाळेत त्या भरती झाल्या.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : ‘मला कीर्तनाची आवड आहे. मी कीर्तन करायला जाते. परंतु, मी जे कीर्तन करते, ते मला वाचता यावे. मला ते शब्द बोलता येण्याबरोबरच, वाचता यावे’, अशा शब्दांत विमलमावशींनी त्यांची लिहिण्यावाचण्याची आवड बोलून दाखवली आणि त्या दिवसापासून संध्याताई सावंत यांच्या शाळेत त्या भरती झाल्या. जेमतेम सहा महिन्यांत विमलमावशींना लिहावाचायला शिकवण्याचा निर्धार संध्यातार्इंनी केला आहे.विमलमावशी या संध्यातार्इंकडे काम करतात. निरक्षरांना साक्षर करण्याचा विडा उचललेल्या संध्याताई आदिवासीपाड्यातील महिला, मुलींसह आपल्या घरात कामाला येणाऱ्या मावशींनाही ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’ चे धडे शिकवत आहेत.माझे सामाजिक कार्य मावशींना माहीत होते, त्यामुळे त्यांनी माझ्याकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. बाराखडीपासून त्यांनी शिकण्यास सुरुवात केली. आता त्या दोन अक्षरी शब्द गिरवत आहेत. गेले दोन महिने त्यांची शिकवणी सुरू आहे, असे संध्यातार्इंनी सांगितले. घरातील काम झाल्यावर संध्याताई या विमलमावशींची दररोज अर्धा तास शिकवणी घेतात. आपल्या मुलीला इंग्रजी शिकवायला यावे, म्हणून त्यांच्याकडे घरकामाला येणाऱ्या सीमा यांनीही त्यांच्याकडे इंग्रजी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनाही संध्याताई इंग्रजीचे धडे देणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात १० वर्षे काम केल्यावर २०१२ साली संध्यातार्इंनी नोकरीला रामराम केला. नोकरी सोडल्यावर त्यांनी महिला आणि मुले यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले. त्यांनी सुरुवातीला स्वतंत्रपणे आदिवासी व झोपडपट्टीतील मुलांना शिकवले, खेळण्यांचे वाटप केले. पनवेलच्या रामवाडी येथील आदिवासीपाड्यात मैत्रिणीसोबत जाऊन पिण्याची, शौचालयाची सोय केली. तेथील महिलांना रोजगार मिळावा म्हणून कागदी पिशव्या बनवण्याचे, तर युवकांना रोजगार मिळावा म्हणून स्वखर्चातून सौरऊर्जेचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले. ठाण्यातील सिग्नलशाळेतील मुलांना शिकवण्याबरोबर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांबरोबर काम केले. वसतिगृहात राहणाºया आदिवासी मुलींना चित्रकला, हस्तकलेचे शिक्षण त्या देत आहेत. गेल्या वर्षी त्यांनी स्वत:ची मातृसेवा फाउंडेशन ही संस्था सुरू केली. ज्या महिला निरक्षर आहेत, त्यांना साक्षर करणे आणि ज्या साक्षर आहेत, त्यांना स्वावलंबी बनवणे, हा या संस्थेमागचा हेतू आहे. आदिवासीपाड्यातील महिलांना साक्षर करण्याचा विडा उचलला आहे.>संस्थेच्या महिला या धर्माचापाडा येथे स्थायिक झालेल्या महिलांना शिकवण्यास जातात. पालिका शाळा क्र. ५५ मध्ये त्यांनी प्रयोगशाळा, वाचनालय सुरू केले आहे. या शाळेतील मुली आणि त्यांच्या पालकांना महिला दिनानिमित्त स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत.वसतिगृहातील मुलींना चित्रकला, हस्तकला शिकवितात.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनWomenमहिला