हजरत हुसेन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीचा दिवस

By Admin | Updated: October 13, 2016 03:25 IST2016-10-13T03:25:28+5:302016-10-13T03:25:28+5:30

इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले.ज्याने इस्लाम धर्माचा

Hazrat Hussain's Remembrance Day | हजरत हुसेन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीचा दिवस

हजरत हुसेन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीचा दिवस

जव्हार : इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले.ज्याने इस्लाम धर्माचा चेहरामोहराच बदलून टाकला. हिजरी संवतचा (इस्लामिक वर्ष ) पहिला महिना म्हणजे मोहरम ! मोहरमच्या १० तारखेला (१० मुहर्रम ६१ हिजरी, अर्थात इ.स.६८० मध्ये) मोहम्मद पैगंबर साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे खलिफा यजीद बिन मुआविया यांच्या साथीदारानी ज्या दिवशी युद्धात मारले होते. तो दिवस म्हणजे यौमे आशुरा होय. याच दिवशी हजरत हुसैन यांच्या वीरमरणाच्या स्मृतीमध्ये मुस्लिम बांधव मोहरम साजरा करतात.
करबलामध्ये एका बाजूला हजरत हुसेन यांच्यासोबत केवळ ७२ तर दूसरया बाजुला यजिद यांचे तब्बल ४० हजार सैनिक होते.७२ जणांमध्ये महिला-पुरूष व ५१ मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. अशा परिस्थितीही ते युध्दास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. दुसऱ्या बाजुला यजिद यांच्या सैन्याची कमान उमर इब्ने सईद यांच्या हातात होती. युध्दाचे कारण -इस्लाम धर्माचे पाचवे खलिफा अमीर मुआविया यांनी खलिफाच्या निवडणुकीत समाजाच्या विरोधात जाऊन त्यांचा मुलगा यजिदला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले.
यजीद हा त्या काळी गुंड म्हणून प्रसिध्द होता. त्यामुळे मुस्लिमांना तो खलिफा झाल्याचे रूचले नाही.यजिदने समाजाविरूध्द बंड केले पण यजिद समोर मोहम्मद पैगंबर यांच्या परिवारातील हजरत हुसेन यांचे आवाहन होते कारण ते यजिदसमोर झुकण्यास तय्यार नव्हते. यजिदने हजरत हुसैन यांनी त्याला खलिफा पदासाठी मान्य करण्यासाठी दम दिला.
इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा म्हणून मान्य न केल्याने करबला या गावावर युद्धाचे ढग गोळा झाले. हजरत हुसेन यांनी आपले मोठे बंधु इमाम हसन यांच्यासोबत आपल्या परिवारातील लहान मुले व महिलांसह यजिदशी युद्ध केले. यात हजरत हुसेन यांच्या परिवारातील सर्वजण शहिद झाले. पण पराक्रमी योद्धा असलेल्या हुसेन यांचा ते पराभव करु शकले नाही.
युद्धभुमीवर सायंकाळची (असरची) नमाज अदा करत असताना जेव्हा हजरत हुसैन हे सजदा मध्ये गेले (सजदा-माथा टेकून नमाज मध्ये झुकणे) तेव्हा यजीदच्या सैन्याने हिच संधी मानून हजरत हुसैन यांच्या पाठीत धोक्याने वार केला.त्यात हजरत हुसैन शहीद झाले. त्यामुळेच हजरत हुसैन यांना शहीद-ए-आजम म्हटले
जाते.

Web Title: Hazrat Hussain's Remembrance Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.