शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 05:36 IST2018-10-23T05:36:12+5:302018-10-23T05:36:25+5:30

दुचाकीचा धक्का कारला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दिपेश आणि हितेश बांदेकर या दोन भावांना जबर मारहाण करणाऱ्या एका हॉटेलचा व्यवस्थापक कुणाल पाटील याच्यासह पाच जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

Harmanai, five people arrested on charges | शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक

शुल्लक कारणावरून हाणामारी, पाच जणांना अटक

ठाणे : दुचाकीचा धक्का कारला लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दिपेश आणि हितेश बांदेकर या दोन भावांना जबर मारहाण करणाऱ्या एका हॉटेलचा व्यवस्थापक कुणाल पाटील याच्यासह पाच जणांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.
दिपेश बांदेकर हा मित्र सुमित कांबळेसह तीन पेट्रोल पंप येथून २२ आॅक्टोबर रोजी पहाटे जात होते. त्यावेळी दिपेशच्या दुचाकीचा कुणालच्या कारला धक्का लागला यातून त्याला कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी जबर मारहाण केली. वाद सोडविण्यासाठी गेलेल्या दिपेशचा भाऊ हितेशलाही त्यांनी मारहाण केली. दरम्यान, दिपेश आणि हितेश यांनी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप कुणाल पाटील यांनी केला असून त्यांच्याविरुद्धही तक्रार दाखल केली.

Web Title: Harmanai, five people arrested on charges