शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

ठाण्यात ४४ अतिधोकादायक इमारतींवर लवकरच हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 23:54 IST

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समित्यांच्या क्षेत्रामध्ये ऐन पावसाळ्याच्या दरम्यान धोकादायक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.

ठाणे : ठाणेकरांवर एकीकडे कोरोनाचे संकट घोंघावत असताना दुसरीकडे धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींंना नोटिसा बजावण्यात येत आहेत. सध्या ७९ पैकी ३५ अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी इमारती रिक्त केल्या असून ४४ इमारतींवर येत्या काही दिवसांमध्ये कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट या प्रभाग समित्यांच्या क्षेत्रामध्ये ऐन पावसाळ्याच्या दरम्यान धोकादायक इमारती कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींमधील कुटुंबीयांचे अन्यत्र स्थलांतर करून त्या रिकाम्या करण्यास पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात ऐन पावसाळ्यात शेकडो ठाणेकरांवर अगदी हक्काचे घर सोडण्याचीही नामुश्की येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ज्या दुरुस्त करून पुन्हा वास्तव्य करता येणे शक्य आहे, अशा इमारतींना दुरुस्त करून त्याबाबतचा अहवाल महापालिकेकडे देण्याच्याही नोटिसा काही इमारतींना बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोपरी-नौपाड्याला सर्वाधिक धोकाठाणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये ठाण्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोपरी-नौपाड्यात सर्वाधिक ३७ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यानंतर, मुंब्रा भागात १४ इमारतींचा समावेश असून वर्तकनगरमध्ये नऊ इमारती आहेत. त्याचबरोबर उथळसर ७, लोकमान्यनगर-सावरकरनगर प्रभाग समितीमधील कामगार रुग्णालय वसाहतीच्या पाच इमारती, कळवा- तीन, दिवा आणि वागळे इस्टेटमध्ये प्रत्येकी एका अतिधोकादायक इमारतीचा समावेश आहे.तब्बल चार हजार इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेतठाण्यातील चार हजार ११३ इमारतींना सध्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये सी-२ बी या इमारती रिकाम्या न करता दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या दोन हजार २८३ इमारती आहेत. तर, सी-३ या किरकोळ दुरु स्ती करण्यायोग्य असलेल्या एक हजार ८३० इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारती दुरु स्त करून वास्तव्य करण्याच्या नोटिसा संबंधित गृहसंकुलांना पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.- 4300 इमारती धोकादायक महापालिकेने घोषित केलेल्या धोकादायक इमारतींपैकी सी-१ हा अतिधोकादायक इमारतींचा प्रकार असून अशा इमारती नोटीस बजावल्यानंतर काही कालावधीनंतर जमीनदोस्त केल्या जातात. तर, सी-१-ए मधील म्हणजे धोकादायक इमारती रिकाम्या करून त्यांचे संरचनात्मक परीक्षण केले जाते.यंदा सर्वेक्षणामध्ये ठामपाच्या क्षेत्रातील 09 प्रभाग समित्यांमधील सुमारे 4300 धोकादायक इमारतींची यादी आहे. त्यामध्ये अतिधोकादायक 79 इमारतींचा समावेश आहे. त्यापैकी 35 इमारती रिक्त केल्या असून आता केवळ 44 इमारती या प्रकारामध्ये शिल्लक आहेत. त्याही रिक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.घरे खाली करण्यास रहिवाशांचा नकार सी-२-ए मध्ये ११३ इमारतींचा समावेश आहे. यातही सुमारे १५० पेक्षा अधिक कुटुंबे ही धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत.या इमारतींमधील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या दुहेरी संकटामुळे अनेक इमारतींमधील रहिवाशांनी त्या रिक्त करण्यास नकार दिला आहे.अशा वेळी ज्या इमारती कधीही कोसळण्याच्या म्हणजे अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत, त्या शक्य होईल तितक्या लवकर रिकाम्या करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

- ठाणे शहरात ७९ अतिधोकादायक इमारती होत्या. त्यापैकी ३५ इमारती या रहिवाशांनी रिकाम्या केल्या आहेत. उर्वरित इमारतीदेखील रिकाम्या करण्यासाठीची प्रक्रिया युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. - अशोक बुरपुल्ले, उपायुक्त, ठाणे महानगरपालिका

टॅग्स :thaneठाणे