शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जमीन हडपल्याच्या कारवाईतील हलगर्जी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना नडली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 8:50 PM

या आदिवासींच्या अज्ञानाच्या गैरफायदा घेऊन जमीन बळकवल्या प्रकरणी लोकमतने या आधीदेखील वेळावेळी वृक्ष प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्षही वेधलेले आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई न केल्यामुळे परिहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी आदिवासी शेतकरी विठ्ठल शिद, बाळाराम शिद या अज्ञान आदिवासी शेतक-यांची बाजू मांडली आहे

ठळक मुद्देमहसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना एसटी आयोगाने ‘समन्स’१२ जुलैरोजी नवी दिल्ली येथे सुनावणीसाठी हजर होण्याचे आदेश जारी

ठाणे : कांबा - वाघेरापाडा ता. कल्याण येथील आदिवासी शेतकऱ्यांची शेकडो एकर शेत जमीन उल्हासनगर येथील व्यापारी व विकासकांनी बनावट शेतकरी दाखल्यांव्दारे हडप केल्याचा आरोप आहे. यावरील कारवाईत हलगर्जी केल्यामुळे महसूलच्या अतिरिक्त मुख्य सचिवांसह ठाणे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती - जमाती (एससी-एसटी) आयोगाने समन्स देऊन बोलवणे केल्याामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.या आदिवासींच्या अज्ञानाच्या गैरफायदा घेऊन जमीन बळकवल्या प्रकरणी लोकमतने या आधीदेखील वेळावेळी वृक्ष प्रसिध्द करून प्रशासनाचे लक्षही वेधलेले आहे. मात्र त्यावर ठोस कारवाई न केल्यामुळे परिहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विशाल गुफ्ता यांनी आदिवासी शेतकरी विठ्ठल शिद, बाळाराम शिद या अज्ञान आदिवासी शेतक-यांची बाजू मांडली आहे. याची गांभीर्याने दखल घेत एसटी आयोगाने राजस्थानच्या महसूल विभागाचे सचिव, सिरोहीचे जिल्हाधिकारी यांच्यासह ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र नार्वेकर, पोलीस अधीक्षक डॉ . शिवाजी राठोड यांना एसटी आयोगाने ‘समन्स’ बजावून १२ जुलैरोजी नवी दिल्ली येथे सुनावणीसाठी हजर होण्याचे आदेश जारी केले आहे. आयोगाने या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखली सुनावणी लावल्यामुळे प्रशासनात एच खळबळ उडाली आहे.कांबा वाघेरापाडा येथील स. नं. ४७/१, ४७/२,१०८/३ १२१/१,आदी शेत जमीन उल्हासनगर येथील व्यापारी बिल्डर प्रकाश बुधरानी, निशा बुधरानी, शीतल बुधरानी, गिरीश बुधरानी, विशाल बुधरानी, यांनी राजस्थान राज्यातील शिवगंज, सिरोही, गाव ‘मनाधर’ येथील शेतकरी असल्याचा बोगस दाखला सादर करु न जमीन खरेदी केल्याचा दावा केला जात आहे. या विरोधात तक्र ार दाखल करून ही फेरफार नोंदी करण्यात आल्याची मनमानी देखील प्रशासनाने केली आहे. याशिवाय या प्रकरणी कल्याण न्यायालयात देखील प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.कल्याण तहसीलदारांनी या जमीन प्रकरणी गंभीर बाब आहे असा अभिप्राय देऊन जिल्हाधिकाºयांकडे कारवाईसाठी पाठवलेले आहे. दरम्यान बुधरानी सह शांतीलाल पोरिया, अश्विनी कुमार शहा आणि जमीन मालक विष्णू फडके यांच्या वारसाविरोधात अ‍ॅक्ट्रासिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. या कालावधीतच प्रशासनाने फेरफार नोंदविण्याची मनमानी केल्याचा आदिवासी शेतकºयांचा आरोप आहे.या शेकडो एकर जमीनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना प्रकाश बुधरानी यांनी स. नं १०८/३, १२०/१,१२१/१ ही जमीन योगेश नारायण देशमुख यांना विकल्याचा आरोपही शेतक-यांकडून केला जात आहे. न्यायप्रविष्ठ या जमीन प्रकरणात तत्कालीन तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी या दोषी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात मदत करून विधानसभतील लक्षवेधी सूचनेलादेखील उलटसूलट उत्तरे दिल्याचा आरोप आहे. यानंतरच्या वेळीवेळी झालेल्या चौकशीनंतरही देशमुख यांनी ही जमीन तिसºया म्हणजे गुणवंत प्रेमराज भंगाळे, नरेश भाटिया आणि नोतदास तनवाणी यांना विकून फेरफार नोंदणी केल्याची गुप्ता यांच्याकडून स्पष्ट केले जात आहे. या जमिनीवर अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे. नियमा विरोधात शिफारशी करण्यात आल्या असून परवानगी देखील ज्या अटी शर्ती नुसार देण्यात आली आहे त्याचे पालन होताना दिसत नसल्याचे गुप्ता यांनी निदर्शनात आणून दिले आहे.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी