ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2022 13:12 IST2022-03-23T13:12:25+5:302022-03-23T13:12:31+5:30

तत्पूर्वी या कामगारांनी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केले.

Half-naked agitation of contract workers at Thane Municipal Corporation headquarters | ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोल

ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांचे अर्धनग्न आंदोल

ठाणे : मागील वर्षाचे सानुग्रह अनुदान, तीन महिन्यापासून चे थकीत वेतन, लेव्ही, महागाई भत्ता, गणवेश आदी विविध मागण्यांसाठी आज ठाणे महापालिका मुख्यालयावर कंत्राटी कामगारांनी अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी त्यांनी महापालिका प्रशासनाचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

तत्पूर्वी या कामगारांनी ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन केले. मात्र पालक मंत्री नसल्याने त्याने महापालिकेकडे धाव घेतली. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदारावर तात्काळ कारवाई करावी आणि थकीत वेतन तत्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी केली आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याला दहा तारखेपर्यंत वेतन अदा केले जावे, गणवेश मिळावेत अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Web Title: Half-naked agitation of contract workers at Thane Municipal Corporation headquarters