शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात ‘पेमेंट गेटवे’चे खाते हॅक; १६ हजार कोटींचे व्यवहार; २५ कोटींची फसवणूक; सरकारलाही गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 06:31 IST

ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

ठाणे : सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, तर २५ कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी ‘लोकमत’ला रविवारी दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच  दिवसांपासून सुरू होती. परंतु, ठाण्यातील श्रीनगर पोलिस  ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने याप्रकरणी  ६ ऑक्टाेबर २०२३ रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार एप्रिल २०२३  मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून २५ कोटी काढल्याचा आरोप आहे. याच तपासात १६ हजार १८० कोटींची उलाढाल झाल्याचेही उघड झाले आहे. 

६ जणांवर गुन्हा दाखल- ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

- याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील आरोपी जितेंद्र पांडे याने यापूर्वी आठ ते दहा वर्षे बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणून काम केले आहे. 

- या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एका अज्ञात व्यक्तीने सेफेक्स पे आउट कंपनी साॅफ्टवेअर हॅक करून २५ कोटी रुपयांचा अपहार केला. त्यामुळे कंपनीच्या तक्रारीवरून ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. या गुन्ह्याचा तपास ठाण्याच्या सायबर सेलमार्फत करण्यात येत आहे. हा तपास सुरू असताना यातील फसवणुकीच्या २५ काेटींपैकी एक काेटी ३९ लाख १९ हजार २६४ इतकी रक्कम ही रियाल इंटरप्राइजेसच्या नावे असलेल्या एचडीएफसीच्या बॅंक खात्यात वळती झाल्याचे आढळले. - डाॅ. पंजाब उगले, अतिरिक्त पाेलिस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर

रियल इंटरप्राइजेसच्या तपासात २६० बॅंक खाती आढळली. यात १६ हजार १८० काेटींचे व्यवहार झाले आहेत.

कोट्यवधींची रक्कम विदेशात वळतीगुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार यातील दोन आरोपींनी रियल इंटरप्राइजेस या कंपनीच्या वाशीच्या आयडीएफसी या बँक खात्यावरून काही आर्थिक व्यवहार केले आहेत. 

फसवणुकीची रक्कम २५ कोटींची असल्याचे आढळले आहे. त्याप्रमाणे वाशीतील कार्यालयात पोलिसांनी तपासणी केली असता, काही संशयास्पद दस्तऐवज मिळाले आहेत. त्यात विविध कंपनी भागीदारी करार पत्रे, चेकबुक, डेबिट कार्ड आदी आढळले. 

आरोपींनी नौपाडा भागातील कार्यालयात पाच नोटराईस भागीदारी संस्था तसेच अनेक बनावट संस्था स्थापन करून शासनाची फसवणूक केली. या संस्थांमार्फत काही रक्कम यूएसबीमध्ये कन्व्हर्ट करून विदेशात वळती केल्याचे आढळले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी