भिवंडीत पाऊणे सात लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक; गुन्हे शाखेची कारवाई
By नितीन पंडित | Updated: May 13, 2024 18:34 IST2024-05-13T18:32:17+5:302024-05-13T18:34:33+5:30
सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.

भिवंडीत पाऊणे सात लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक; गुन्हे शाखेची कारवाई
भिवंडी : शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा सर्रास पणे विक्री होत असताना भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत तब्बल पाऊणे सात लाखांचा गुटखा जप्त करून सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक केली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने गैबीनगर येथील मोईन मंझील बिल्डींगच्या पहीला मजल्या वरील खोलीत नुरआलम मोहम्मद शाहजहा शेख, बद्रेआलम मोहम्मद शाहजहा शेख,फुरकान अहमद शेख उर्फ बाबा,इसरार अहमद शेख, अकीब व शकील यांनी आपापसात संगनमत करून विमल पान मसाला, दिलबाग, राजनिवास या कंपनीचा गुटखा,पान मसाला, सुगंधित सुपारी असा प्रतिबंधीत अवैद्य अन्नपदार्थ विक्रीकरीता साठवणूक करून ठेवला गोणी साठवून ठेवल्याचे आढळून आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणाहून ६ लाख ७९ हजार ७१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत शांतीनगर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून नुरआलम मोहम्मद शाहजहा शेख यास अटक केली असून फरार पाच जणांचा गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.