उसने पैसे मागितल्याच्या रागातून दात पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2023 15:27 IST2023-10-09T15:27:25+5:302023-10-09T15:27:32+5:30

उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात राहणारा रोहित कुकरेजा याने दिलेल्या पैशाची मागणी विशाल संजू साबळे यांच्याकडे केली.

gritted teeth in anger at being asked for money | उसने पैसे मागितल्याच्या रागातून दात पाडले

उसने पैसे मागितल्याच्या रागातून दात पाडले

उल्हासनगर : उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून रोहित कुकरेजा यांच्यासह वडील वासुदेव कुकरेजा व भाऊ सनी यांना विशाल साबळे यांच्यासह १० ते १५ जणांच्या टोळीने रविवारी रविवारी साडे आठ वाजता मारहाण केली. या हाणामारीत सनी कुकरेजा यांचे दोन दात पडले असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं-३, ओटी सेक्शन परिसरात राहणारा रोहित कुकरेजा याने दिलेल्या पैशाची मागणी विशाल संजू साबळे यांच्याकडे केली. पैशे मागितल्याच्या रागातून विशाल याने १० ते १५ जणांचे टोळके जमवून रविवारी रात्री साडे आठ वाजता रोहित कुकरेजा यांच्या दुकानावर जाऊन शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. मध्यस्थी करण्यास गेलेले वडील वासुदेव कुकरेजा व भाऊ सनी कुकरेजा यांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. विशाल साबळे यांच्या जिजाजीनें हातातील कडे सनी यांच्या तोंडावर मारल्याने, त्याचे दोन दात पडले.

वडील वासुदेव कुकरेजा यांच्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली. रविवारी १० ते १५ जणांच्या टोळक्याने, रोहित कुकरेजा यांच्यासह वडील वासुदेव कुकरेजा व भाऊ सनी कुकरेजा यांना जबर मारहाण केली. मारहाणीचा निषेध स्थानिक व्यापाऱ्यांनी करून परिसरातील दुकाने बंद केली. याप्रकरणी विशाल साबळे यांच्यासह १० ते १५ जणांच्या टोळक्यावर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हनदाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: gritted teeth in anger at being asked for money