शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हिरवा रंग अनेक झेंड्यांत; भांडवल तरी किती करायचे? एमआयएमवरून मंत्री गणेश नाईक यांचा घरचा आहेर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 11:46 IST

Ganesh Naik: देशाचा तिरंगा ध्वज आणि इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती भांडवल करायचे? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयएमच्या ‘हरा कर देंगे’ या वक्तव्यावर रविवारी येथे मांडत भाजपला घरचा आहेर दिला.

ठाणे -  देशाचा तिरंगा ध्वज आणि इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातही हिरवा रंग आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचे किती भांडवल करायचे? हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे, अशी रोखठोक भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी एमआयएमच्या ‘हरा कर देंगे’ या वक्तव्यावर रविवारी येथे मांडत भाजपला घरचा आहेर दिला.

भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्या पाचपाखाडी येथील माजी गणेशोत्सवाला रविवारी दुपारी नाईक यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी ते म्हणाले, एमआयएमच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्याने त्यांची नगरसेविका सहर शेख आणि माजी खा. इम्तियाज जलील यांनी मुंब्रा आणि महाराष्ट्र हिरवा करू, अशी राजकीय भूमिका मांडली असेल. आपणही भगवे करू म्हणतो. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांचे वक्तव्य बरोबर आहे. कायद्याच्या दृष्टीनेही त्याला आव्हान देता येईल, असे वाटत नसल्याचे सांगत त्यांनी इतर पक्षांनाही खडेबोल सुनावले. हिरवा म्हणजे पाकिस्तानचा हिरवा रंग नाही. मोगलांची भूमिका त्यांनी मांडली तर आमचा विरोधच आहे. त्यांचा धिक्कार करू, असेही ते म्हणाले.

एकटे लढलो असतो, तर भाजपचीच सरशीनवी मुंबईत महापालिकेत जागा वाटपात १११ पैकी ५७ जागा मागत शिंदेसेनेने मोठा भाऊ होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही भाजपची एकहाती सत्ता आणली.

ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरमध्ये युती केली नसती तर तेथेही भाजपची सरशी झाली असती, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. युतीमुळे ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपच्या घोड्यांचे लगाम खेचले गेले. यातून कार्यकर्त्यांची परवड झाली.

तरीही कार्यकर्त्यांनी शिस्त पाळली. युती होऊ नये हे माझे खासगी मत होते. बालेकिल्ले कोणाचेही नसतात, असा थेट इशाराच नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता दिला. मात्र, हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.

मी कल्याण - डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर येथे महापौर बसविले आहेत. ठाण्यात ती संधी दोन मतांनी हुकली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा परिषद, जिल्हा बँक आमच्या ताब्यातच होती, असेही ते म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Green in flags; how much to capitalize? Naik's jab at BJP.

Web Summary : Minister Ganesh Naik criticized MIM's 'Hara Kar Denge' statement, questioning excessive capitalization on the green color, present in national and party flags. He admitted BJP could have won alone in several municipalities, blaming alliance for setbacks.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपा