शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Thane: गरिबांचे घास पुढाऱ्यांच्या घशात, कम्युनिटी किचनला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 01:35 IST

शासनाने या लोकांसाठी तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात अनेक भागांत कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले.

अजित मांडके ठाणे : संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांचे हाल सुरु झाले. त्यामुळे शासनाने या लोकांसाठी तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात अनेक भागांत कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले. हे किचन सुरु करण्यामागे लोकांना जेवण तयार करुन देणे हा उद्देश होता; मात्र यामध्ये राजकीय मंडळी आणि त्यांच्या संस्थांचा हस्तक्षेप वाढून या योजनेला हरताळ फासल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शासनाकडून मिळणा-या मदतीच्या आड अनेक लोकप्रतिनिधींनी आपले मार्केटिंग सुरु केले आहे. काहींनी जेवणाऐवजी किराणा साहित्याची पाकिटे बांधून त्यावर आपल्या नावांची स्टिकर लावली. कहर म्हणजे, काही लोकप्रतिनिधींनी या पाकिटांचे वाटप केवळ आपल्याच मतदारांना केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ २० टक्के मदत, ख-या गरजूंपर्यंत पोहोचत असल्याचा आरोप जाणकारांकडून केला जात आहे.कोरोनाचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणा जीवाची पर्वा न करता काम करीत आहे. दुसरीकडे या जीवघेण्या संकटाकडे संधीप्रमाणे बघून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाण्यात सुरु असल्याची बाब समोर आली आहे. लॉकडाउन झाल्यानंतर सुरुवातीला जिल्हा प्रशासनाकडून रोज कमावून रोज खाणाºया आणि ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशांसाठी किराणा देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. यामध्ये काही सामाजिक संस्थांची मदत घेण्यात आली. मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याने जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या माध्यमातून ही योजना पुढे सुरु ठेवावी, असे सांगण्यात आले. परंतु मधल्या काळात अन्नधान्याऐवजी हातावरील पोट असणाºयांना कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवण देण्यात यावे, अशी संकल्पना पुढे आली. महापालिकेकडे हा उपक्रम आल्यानंतर या योजनेला पूर्णत: हरताळ फासला केला.अनेक राजकीय मंडळी, बड्या नगरसेवकांनी शेकडो टन तांदूळ, दाळ, तेल, मीठ उचलले. दोन ते तीन दिवस काहींनी हे किचन शासनाच्या पथकाला दाखवले. परंतु आता अनेक ठिकाणी हे किचन बंद झाले असून, काही नतद्रष्ट राजकीय मंडळींनी शासनाच्या किराणा साहित्यावर डल्ला मारण्याचे प्रताप केले आहेत. वास्तविक पाहता, ही मदत शासनाकडून येत आहे. मात्र, राजकीय मंडळी ही मदत आपण करीत असल्याचे प्रभागातील नागरिकांना भासवत असून, तयार जेवण देण्याऐवजी अन्नधान्य आपापल्या प्रभागांमध्ये वाटण्याचे काम सुरूझाले आहे. एवढेच काय, काहींनी तर या साहित्याच्या पाकिटांवर आपले ब्रॅण्डिंग केल्याची धक्कादायक माहितीही पालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी दिली आहे. विशेष म्हणजे शासनाकडून आलेल्या या मदतीसाठी शासनाकडून त्यात्या भागात फलकही लावले जात आहेत. ज्या खºया अर्थाने समाजसेवेत व्यस्त आहेत, अशा संस्थांनी या फलकांवर कोणताही आक्षेप घेतला नाही. मात्र मार्केटींग करणाºया नगरसेवकांनी शासनाची मदत घेतल्यानंतर असे फलक लावण्यास मज्जाव केला आहे. काहींना तर शासनाच्या कर्मचाºयांना दमदाटी करुन, तुमचे फलक लावले तर आम्ही परत निवडून येऊ शकणार नाही, असे म्हणत फलक लावण्यास विरोध करत आहेत.कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्याच सामाजिक संस्थांद्वारे पत्रव्यवहार करुन शेकडो टन किराणा सामान उचलले आहे. परंतु ज्यांना त्याची खरी गरज आहे, त्यांच्यापर्यंत ते पोहचत नसल्याची माहितीही आता समोर येत आहे.।मुंब्य्रात एकाच नगरसेवकाने स्वत:च्या संस्थेच्या नावाखाली हजारो टन किराणा साहित्य उचलल्याने इतर नगरसेवकांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्यांनी गुरुवारी ठाणे महानगरपालिकेत चक्क ठिय्याही मांडला. आपल्याकडून मदत पोहोचली नाही, तर नागरिक आपल्याला मतदान करणार नाही, असा सूरही या नगरसेवकाने आळवला.।वाढत्या राजकीय हस्तक्षेपामुळे किचन कम्युनिटी योजनेचा पार बोजवारा उडाला आहे. ज्या सामाजिक संस्था या जनहिताच्या योजनेमध्ये खºया अर्थाने योगदान देत होत्या, त्या संस्थांनाही या मंडळीनी हद्दपार केले आहे. राजकीय त्रासामुळे या सामाजिक संस्थांनी काम बंद केल्याने ज्यांना गरज आहे, अशा अवघ्या २० टक्के नागरिकांपर्यंतच ही मदत पोहोचत असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. उर्वरित मदत नगरसेवकांनी प्रभागातील नागरिकांना अर्थात त्यांच्या संभाव्य मतदारांना दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस