शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

प्रबळ इच्छाशक्ती ! ७० वर्षांच्या आजी चक्क चालवतात ट्रॅक्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 07:09 IST

केवळ मनाची तयारी आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कुठलेही काम करू शकता. याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका ७० वर्षीय आजीबाईने चक्क आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शेतीची कामे करून तरुणांपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

भातसानगर - केवळ मनाची तयारी आणि काम करण्याची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही कुठलेही काम करू शकता. याच दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर एका ७० वर्षीय आजीबाईने चक्क आपल्या  शेतामध्ये ट्रॅक्टर चालवून शेतीची कामे करून तरुणांपुढे आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.आज महिला पुरुषांच्या बरोबरीने आहेत, असे आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. या आजीबाईंनी आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालून शहापूर तालुक्यात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मला हे येत नाही, ते येत नाही, असे म्हणून निराशा पदरी बाळगून जीवन जगणाऱ्यांना या आजीने आगळावेगळा संदेशच दिला आहे.    शहापूर तालुक्यातील वेहलोळी गावातील लक्ष्मीबाई लक्ष्मण वेखंडे (७०) यांनी आपल्या शेतामध्ये स्वतः ट्रॅक्टर चालवून सर्वांना आश्यर्याचा धक्काच दिला. शेतात काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि समर्थपणे कुटुंब सांभाळण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे काम केले.२००२ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळत आपल्या मुलांना कार्यक्षम बनवले. एक मुलगी अंगणवाडी शिक्षिका, दुसरी ज्युनिअर कॉलेजची शिक्षिका आणि तिसरी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षिका आहे, तर मुलगा माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून काम करतो. शेतकऱ्यांसमोर आगळावेगळा आदर्शवेखंडे या मुलांना शिक्षण दिल्यानंतर येथेच थांबल्या नाहीत, तर त्या स्वतः ट्रॅक्टरवर बसून आपल्या  शेतीची कामे करत आहेत. आज पन्नाशी ओलांडली की, माणसांना व्याधी जडतात आणि निराशमय जीवन जगतात. मात्र, त्यांनी या सगळ्या गोष्टींना मूठमाती देऊन शेतीचे काम करत शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेthaneठाणे