तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी कलशासह भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे भिवंडीत भव्य स्वागत
By नितीन पंडित | Updated: February 12, 2023 19:30 IST2023-02-12T19:29:25+5:302023-02-12T19:30:10+5:30
या धम्म यात्रेचे रविवारी भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावरी पडघा येथे या पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थी कलशासह भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे भिवंडीत भव्य स्वागत
नितीन पंडित
लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तथागत भगवान गौतम बुध्द अस्थी कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा परभणी ते मुंबई चैत्यभूमी पर्यंत भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.या धम्म यात्रेचे रविवारी भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावरी पडघा येथे या पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील हजारो बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष रस्त्यावर भर उन्हात स्वागता साठी उपस्थित होते.या पदयात्रेत थायलंड येथील ११० बौद्ध भिख्खू सहभागी झाले असून त्यांच्या स्वागतासाठी महामार्गावर फुलांचा सडा पसरण्यात आला होता. या धम्मयात्रेचे आयोजन तथागत गौतम बुद्ध या मालिकेतील कलाकार गगन मलिक,परभणीचे डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या नेतृत्वाखाली राकेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कसारा ते ठाणे दरम्यानच्या प्रवासाचे आयोजन केले होते.तर पडघा येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल येथे या धम्म यात्रेचे स्वागत करण्यात आले.भिक्षुसंघाच्या वतीने यावेळी उपस्थित बांधवांना धम्म देसना देण्यात आली.
यावेळी भारतातील नागरिकांकडून आम्हाला मिळालेला सन्मान खूप मोठा असून महाराष्ट्रात आमच्यावर जनतेने जे प्रेम केले ते कधीही न विसारणारे आहे अशी प्रतिक्रिया थायलँड येथील बौद्ध भिक्खू यांनी दिली आहे.तर भारत या जगप्रसिद्ध बुद्ध भूमीत बुद्ध पुन्हा परतायला हवेत व बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या धम्म चक्रला गती देणे गरजेचे आहे यासाठी या धम्म यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया प्रसिद्ध कलाकार गगन मलीक यांनी यावेळी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"