अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!
By पंकज पाटील | Updated: October 17, 2022 13:12 IST2022-10-17T13:10:32+5:302022-10-17T13:12:15+5:30
अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले.

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीवर भाजप-शिंदे गटाचा झेंडा!
अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा शिंदे गटाने आपले वर्चस्व निर्माण केले असून सरपंच पदी देखील याच गटाचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या शिंदे गटात फूट पडली होती त्या फुटी मध्ये एक गट भाजपासोबत युतीमध्ये निवडणूक लढवत होता तर दुसरा गट स्वतंत्रपणे आपले अस्तित्व निर्माण करीत होते.
वांगणी ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदी भाजपा शिंदे गटाच्या ग्रामविकास आघाडीला यश मिळाले आहे वनिता आढाव या वांगणीच्या सरपंच पदी निवडून आल्या आहेत. तर १७ पैकी १२ जागांवर ग्रामविकास युतीचेच उमेदवार विजयी झाले आहेत.
तर स्वबळावर निवडणूक लढणाऱ्या शिंदे गटातल्याच वामन म्हात्रे प्रणित दुसऱ्या गटाने ४ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फक्त १ जागा जिंकता आली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"