शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 22:01 IST

मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

धीरज परब

मीरारोड - महापालिका निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाईंदर येथील भाजपच्या प्रचार सभेत केले. शहरातील विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार आणि बांधण्यासाठी गरज पडल्यास निधी पण देणार असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले. 

भाईंदरच्या बाळासाहेब ठाकरे मैदानात भाजपाच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भोजपुरी कलाकार व खासदार दिनेशलाल यादव, पूनम महाजन, आमदार नरेंद्र मेहता सह अनेक भाजपा पदाधिकारी, निवडणूक उमेदवार उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ सालच्या महापालिका निवडणुक वेळी जाहीरसभेत लोकांना आवाहन केले होते आणि लोकांनी भाजपाच्या दोन तृतीयांश नगरसेवक निवडून दिले. तेव्हा शहराला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम केले. पिण्याच्या पाण्याची समस्या सूर्या धरणच्या पहिला टप्पा ७५ दशलक्ष लिटर पाणी आणले. दुसरा टप्पातील अडचणी दूर केल्या असून या वर्षीच रोज पाणी मिळेल. जानेवारी अखेरीस मीरारोड मेट्रो सुरु होईल. निवडणूक झाल्यावर डोंगरी येथील कारशेड रद्द करणार असं त्यांनी सांगितले. 

तसेच काँग्रेस सरकारने ११ वर्षात केवळ ११ किमी मेट्रो केली. आपण एमएमआर क्षेत्रात मेट्रोचे ४७५ किमीचे नेटवर्क तयार केले. .लोकल, मेट्रो व बेस्ट चे तिकीट साठी एकीकरण करत वन ऍप केले आहे. सर्व महापालिका क्षेत्रात मेट्रो, लोकल व बस हि एका तिकिटावर प्रवास करता येणार. पश्चिम महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या मोठी असून ३ - ३ तास जाम असतो. ६० टक्के वाहतूक ह्या मार्गावर असते. मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात असून काही परवानगी सर्वोच्च न्यायालयातून घेतल्या आहेत. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, जुन्या इमारतींचा प्रश्न सोडवण्यासाठी क्लस्टर योजनेत काय काय बदल हवे ते सांगा. मग ते अंतिम करू. भीमसेन जोशी सरकारी रुग्णालय  मल्टीस्पेशालिटी करणार. पार्किंग प्लाझाची गरज, भटक्या प्राण्यांसाठी रुग्णालय, उत्तनच्या मच्छीमारांची मासळी बाजार व प्रॉपर्टी कार्डची मागणी, कत्तलखाना आरक्षण आदी मुद्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उल्लेख केला.  झोपडपट्टी पुनर्विकास करायचा असून मिठागर जागेतील झोपडपट्टी जागा राज्य सरकारला द्या व तिकडे प्रधानमंत्री आवास योजना नुसार त्यांचे पुनर्वसन करणार. इकडे महापौर बसवाल तसेच ह्या मिठागरच्या जागा तुमच्या कडे देऊ. महात्मा फुले योजनेत आता ५ लाख वरून ३५ लाख पर्यंतचे शस्त्रक्रिया, उपचार करणार. शहरात अश्या योजना असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवणार असे मुख्यमंत्री फडणवीस  यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Free Land for Community Buildings in Mira Bhayandar: CM Assurance

Web Summary : Chief Minister Fadnavis promised free land and funds for community buildings in Mira Bhayandar. He highlighted infrastructure projects like the Surya dam and metro, promising improved water supply and connectivity. He also addressed slum redevelopment and healthcare improvements, including expanded coverage under the Mahatma Phule scheme.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Mira Bhayander Municipal Corporation Electionमीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा