शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाकडून मिहीर कोटेचांच्या कार्यालयाची तोडफोड; मुंबईत जोरदार राडा
2
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
3
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
4
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
5
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
6
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
7
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
8
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
9
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
10
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
11
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
12
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
13
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
14
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
15
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
16
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
17
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
18
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
19
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
20
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान

कुंभमेळ्यावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा- भन्ते खेम धम्मो महास्थवीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 6:11 PM

सत्तेवर असलेल्या सरकारकडून एका विशिष्ट धर्माला नावाखाली कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे.

कल्याण- सत्तेवर असलेल्या सरकारकडून एका विशिष्ट धर्माला नावाखाली कुंभमेळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. हिंदू धर्माल झुकते माप देऊन कोणत्या संविधानाप्रमाणे आपण धर्मनिरपेक्षता जपतो का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुंभमेळ्य़ावरील सरकारी खर्च हा देशाला दिवाळखोरीत लोटणारा आहे. तसेच कुंभमेळा हा देशाला अज्ञानाच्या दरीत लोटणारा आहे. त्याला सरकारचे पाठबळ मिळत असल्याची प्रखर टीका भन्ते खेम धम्मो महास्थवीर यांनी येथे केले.समता सांस्कृतिक केंद्र कल्याण अंतर्गत इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस ऑगनायझेशनच्या वतीने फडके मैदानात आंतरराष्ट्रीय धम्म परिषद-2019 आयोजन आज रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी भन्ते खेमा धम्मो महास्थवीर उपरोक्त वक्तव्य केले. याप्रसंगी पंडित भदन्त ज्ञानेश्वर, ऑल इंडिया भिक्खू संघाचे अध्यक्ष सदानंद महास्थवीर, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच्या आयोजनासाठी भन्ते आग्गा धम्मा थेरो यांनी अथक परिश्रम घेतले. या प्रसंगी आमदार गायकवाड व पवार यांचासह प्रदीप जगताप व रिक्षाचालक रमेश लोखंडे यांचाही सत्कार करण्यात आला.भन्ते खेम धम्मो यांनी सांगितले की, कुंभमेळाव्यात गेल्यावर मनुष्याचे मन प्रचंड उदास होते. कुंभमेळाव्यातील प्रदर्शन पाहिल्यावर मानव जात किती अज्ञान आणि भोळेपणाच्या आहारी गेली आहे. बाह्य शुद्धीच्या मागे लागली आहे. कर्मकांडाच्या आहारी गेली आहे. कोणत्याही पाण्यात कितीही डुबक्या मारल्या तरी मानवाचे मन निष्पाप होत नाही. तसेच मनुष्याच्या मनातील मानसिक द्वेष, क्रोध, मत्सर, अहंकार जात नाही. दाढी वाढवून, अंगाला भस्म लावून, एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली तरी मनाची तपश्चर्या होऊ शकत नाही. खरी तपश्चर्येचा मार्ग विपश्यना आहे. ती घेतल्यावर मानव विकारमुक्त होण्यास मदत होते.