शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

गोराई-मनोरी रो-रो सेवा नाणारप्रमाणेच रद्द करण्यास सरकारला भाग पाडू - उल्का महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 10:53 PM

राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

भाईंदर - राज्य सरकारने गोराई येथे रो-रो सेवा सुरू करण्यासह वाहतुक पूल बांधण्याचा घाट घातला असुन त्यात येथील हिरवळ व कांदळवन नष्ट होऊन वाढत्या वाहनांमुळे प्रदुषणात वाढ होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारने यासाठी स्थानिकांना विचारात न घेताच हा प्रकल्प जबरदस्तीने ग्रामस्थांच्या माथी मारला जात आहे. हा प्रकल्प नाणारप्रमाणेच जनविरोधातून रद्द करण्यास राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन यांनी दिला आहे. 

त्या सोमवारी गोराई चर्च येथे आयोजित गोराई, मनोरी व उत्तन ग्रामस्थांच्या सभेत बोलत होत्या. केंद्र व राज्य सरकार सागरमाला योजनेद्वारे सर्व सागरी किनारे एकमेकांना जोडून रो-रो सेवा  सुरू करणार आहे. त्यापैकी गोराई येथील प्रकल्पासाठी राज्य सरकारने स्थानिक जनमताचा कौल न घेता, त्यांची सुचना व हरकतीची प्रक्रीया मोडीत काढून थेट प्रकल्पाच्या कामालाच सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबई उपनगर व आसपासच्या शहरांना येथील हिरवळीमुळे ऑक्सिजन  मिळतो. मुंबईसारखेच काँक्रिटचे जंगल प्रस्तावित रो-रो सेवेमुळे येथेही सरकार साकारण्याचे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप त्यांनी केला.खाडीतील मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावरील कांदळवन क्षेत्रात येत असतात, कांदळवनच नष्ट झाल्यास मासे अंडी कुठे घालतील, असा प्रश्न उपस्थित करुन मासळीची संख्या रोडावून मासेमारी व्यवसाय धोक्यात येण्याची भिती त्यांनी व्यक्त केली. पावसाळ्यात स्थानिक मच्छिमार आपापल्या बोटी गोराई खाडीत नांगरतात. रो-रो सेवा सुरू झाल्यास या बोटींना नांगरण्यासाठी जागाच उपलब्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने गोराई, मनोरी, पाली, उत्तन, चौक, डोंगरी, तारोडी या गावांमध्ये विशेष पर्यटन क्षेत्र जाहिर केल्यानंतर गोराई खाडी मार्गे वाहतुक पूल प्रस्तावित केला आहे. या पूलामुळे उत्तन-गोराईमध्ये मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ वाढणार असुन त्यातून या प्रदुषणविरहित गावांत प्रदुषणाचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढण्याची भिती त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम येथील हिरवळीवर होणार असल्याचा दावा त्यांनी केला.रो-रो सेवेसाठी गोराई खाडीच्या दोन्ही बाजुंकडील प्रस्तावित जेट्टींच्या बांधकामामुळे तेथील तिवरक्षेत्र नष्टच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या खाडीकिनारी मासळी विक्रीचा व्यवसाय करणाय््राा कोळी महिलांच्या रोजगारावर गडांतर येणार असताना त्यांच्या रोजगाराचा विचारही या प्रकल्पात करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले. गावातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असुन या गावांचा कायापालट व सुशोभिकरण हे तेथील ग्रामस्थच करतील. त्याची काळजी सरकारने करु नये, अशी समजही त्यांनी दिली. तत्पुर्वी डिसेंबर २०१८ मध्ये गोराई येथील होली मॅगी डिसेचर्चच्या सभागृहात मुंबई मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसोबत या सातही गावांतील ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोर्डाचे अधिकारी हजर होते. त्यावेळी सुद्धा ग्रामस्थांनी या प्रकल्पांना विरोध दर्शविला होता. याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर २५ फेब्रूवारी रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्या. एन. जे. जमादार व न्या. बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने एका आठवड्यात राज्य सरकारने वन विभाग, एमसीझेडएमएकडे आदी संबंधित विभागाच्या अटी, शर्तींची पुर्तता करुन परवानगी घ्यावी, त्यानंतरच कामाला सुरुवात करावी, असे निर्देश दिले आहेत. यावर बोलताना महाजन यांनी राज्य सरकारने न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर केल्याचा आरोप करीत नाणार प्रकल्प जसा तेथील ग्रामस्थांच्या विरोधामुळे रद्द झाला तसाच हा प्रकल्प रद्द करण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा देत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.यासाठी मंगळवारपासून गावागावांत जनजागृतीच्या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी गोराई मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष जोजफ मनोरकर, उत्तन कोळी जमात कल्मेत गौऱ्या, धारावी बेट बचाव समितीचे अध्यक्ष जोसेफ घोन्सालवीस, समन्वयक प्रा. संदीप बुरकेन, मनोरी मच्छिमार संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर