शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शासनाने ६८२ कोटींचा हप्ता भरल्याने विमा कंपन्यांचे चांगभले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 2:43 AM

२०१८ मध्ये राज्य सरकारने १७०५ कोटी ७३ लाख ९१ हजार ७३५ रुपयांचा विमा हप्ता भरला होता.

- नारायण जाधवठाणे : जूनमध्ये पीक विमा योजनेबद्दल शिवसेनेने मोर्चा काढून १५ दिवसांची मुदत महाराष्ट्र सरकारला दिली होती. ही मुदत दिल्यानंतर ५३ लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवून ९६० कोटींची भरपाई मिळाल्याचा दावा करून उर्वरित अपात्र ठरलेल्या ९० लाख शेतकऱ्यांनाही सरसकट पात्र ठरवून उरलेल्या २ हजार कोटींतून विम्याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.मात्र, असे असले ठाकरे यांच्या मागणीच्या आठ दिवसांपूर्वीच अर्थात १६ आॅगस्ट रोजी राज्याच्या कृषी विभागाने (शेतकºयांना २०१८ ची विमा नुकसानभरपाई मिळण्यापूर्वीच) संबंधित विमा कंपन्यांना २०१९ च्या पंतप्रधान पीकविम्याच्या हप्त्यापोटी ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ रुपयांची रक्कम वितरित केल्याने या कंपन्यांची चांगलीच चांदी झाली आहे. मात्र, ही रक्कम वितरित करून आठ दिवस उलटले तरी विरोधकांसह शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने अथवा आमदाराने त्यास आक्षेप न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.२०१८ मध्ये राज्य सरकारने १७०५ कोटी ७३ लाख ९१ हजार ७३५ रुपयांचा विमा हप्ता भरला होता. यात भारतीय कृषी विमा कंपनीस १५५९ कोटी ४० लाख ७८ हजार २५० तर बजाज अलियान्स इन्शुरंन्स कंपनीच्या हप्त्याचे १४६ कोटी ३३ लाख १३ हजार ४८५ रुपयांचा समावेश होता. या नुकसानभरपाईपासून जुलैअखेरपर्यंत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ९० हजार १३४ शेतकरीही अद्याप वंचित आहेत.यानुसार २०१९ मध्ये या कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या अनुदानाच्या ८० टक्के रकमेच्या ५० टक्के अर्थात ७०७ कोटी दोन लाख ७५ हजार ६५८ रुपये मागितले होते. मात्र, केंद्र शासनाच्या सुधारित नियमानुसार चालू हंगामातील नोंदणी सुरू असतानाच विमा संरक्षित क्षेत्राची उपलब्ध नसली तरीदेखील केंद्र व राज्याच्या पहिला हप्ता अग्रीम स्वरूपात संबंधित कंपनीस आवश्यक असल्याने राज्याच्या कृषी विभागाने ६८२ कोटी २९ लाख ५६ हजार ६९४ इतकी रक्कम या विमा कंपन्यांना १६ आॅगस्ट रोजी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. यात भारतीय कृषी विमा कंपनीच्या हिश्शाचे ६२३ कोटी ७६ लाख ३१ हजार ३०० तर बजाज अलियान्स इन्शुरंन्स कंपनीच्या ५८ कोटी ५३ लाख २५ हजार ३९४ रुपयांचा समावेश आहे.शेतकºयांपर्यंत भरपाई पोहोचवण्याची मागणीप्रधानमंत्री विमा योजनेसाठी २ टक्के रक्कम शेतकरी भारतात. तर, सरकार ९८ टक्के रक्कम भरीत असते. तरीही शेतकºयांना नुकसानभरपाई मिळत नसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हेतर, ज्या ९० लाख शेतकºयांना अपात्र ठरविले त्यासाठी काय निकष लावले हे तपासण्याची गरज असल्याचे सांगून सरकारने विमा कंपन्यांना त्यांचा नफा ठरवून द्यावा, तसेच शेतकºयांना त्यांनी भरपाई दिली नाही, तर सरकारने तो पैसा परत घेऊन आपल्या यंत्रणेतून शेतकºयांपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी केली.जर भरपाई मिळाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही ठाकरे यांनी दिला. परंतु, विमा कंपन्यांना २०१९ चा हप्ता वितरित करून आठ दिवस उलटूनही विरोधकांसह शिवसेनेचे लोकप्रतिनिधी साखरझोपेत असल्याने ते या आंदोलनात उतरतील काय, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी