तारांगणास गोपीनाथ मुंडे यांचे नाव- दामले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 01:59 IST2018-03-30T01:59:49+5:302018-03-30T01:59:49+5:30

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे कल्याण-डोंबिवलीत स्मारक व्हावे

Gopinath Munde's name in the Taranganas - Damle | तारांगणास गोपीनाथ मुंडे यांचे नाव- दामले

तारांगणास गोपीनाथ मुंडे यांचे नाव- दामले

अनिकेत घमंडी  
डोंबिवली : भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावे कल्याण-डोंबिवलीत स्मारक व्हावे, अशी त्यांच्या समर्थकांची ईच्छा होती. परंतु, स्मारकाएवजी अशा थोर व्यक्तींची नावे लोकोपयोगी वास्तू उभारून त्याला देणे आवश्यक आहे, अशी भूमिका स्थायी समितीचे सभापती राहुल दामले यांनी घेतली आहे. त्यानुसार केडीएमसीतर्फे उभारण्यात येणाऱ्या तारांगणास मुंडे यांचे नाव देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
या बाबत दामले म्हणाले, की महापौरांनी तशा आशयाचे पत्र दिले आहे. तारंगणासाठी जागेचा शोध सुरू आहे. युतीच्या वचननाम्यातही तारांगणाचा समावेश होता. वर्षभरात हे तारांगण पूर्ण करण्यावर भर असणार आहे. तारांगणाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल. ग्रह, तारे यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मुंबईला जावे लागणार नाही.

Web Title: Gopinath Munde's name in the Taranganas - Damle