अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुंडानं सोडले ‘डॉबरमॅन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 07:02 IST2020-10-10T00:11:43+5:302020-10-10T07:02:36+5:30
पश्चिमेतील वालधुनी परिसरात मेंटलचीदहशत आहे. त्याच्याविरोधात २२ गुन्हे दाखल आहेत.

अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुंडानं सोडले ‘डॉबरमॅन’
कल्याण : शहरातील कुख्यात गुंड फिरोज मेंटल याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडाने त्याच्या घरातील दोन डॉबरमॅन कुत्रे सोडल्याचा प्रकार घडला आहे, तरीही पोलिसांनी मेंटलला अटक केली आहे.
पश्चिमेतील वालधुनी परिसरात मेंटलची दहशत आहे. त्याच्याविरोधात २२ गुन्हे दाखल आहेत. असा कोणताही गुन्हा नाही, जो त्याने केलेला नाही. २०१८ मध्ये कल्याण न्यायालयात आणले असताना, त्याने पोलिसांसोबत भांडण केले होते. जेलमधून सुटून आल्यावर तो वॉण्टेड होता. दरम्यान, तो वालधुनी येथील घरी आल्याची माहिती महात्मा फुले पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस अधिकारी दीपक सरोदे, गणेश कुंभार यांचे पथक त्याला पकडण्यासाठी पोहोचले. त्यावेळी त्याने दोन डॉबरमॅन कुत्रे सोडले. कुत्रे आणि पोलीस यांच्यात संघर्ष सुरू होता. याचा फायदा घेत मेंटल हा पळून गेला. मात्र, कुत्र्यांना कसेबसे शांत करून अखेर पोलिसांनी मेंटल याला एका तासाभरात जेरबंद केले.