जनहित मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद

By Admin | Updated: October 13, 2016 03:14 IST2016-10-13T03:14:32+5:302016-10-13T03:14:32+5:30

नानभाट जनहित सोसाटीने आोजित केलेल्या स्व. स्टीफन मिनेझिस स्मरणार्थ ५ व जनहित मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. एक धाव आरोग्यासाठी हे घोषवाक्य असलेली स्पर्धा १४ गटात झाली.

Good response to the Janhit Mini Marathon | जनहित मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद

जनहित मिनी मॅरेथॉन स्पर्धेला चांगला प्रतिसाद

वसई : नानभाट जनहित सोसाटीने आोजित केलेल्या स्व. स्टीफन मिनेझिस स्मरणार्थ ५ व जनहित मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद मिळाला. एक धाव आरोग्यासाठी हे घोषवाक्य असलेली स्पर्धा १४ गटात झाली. मॅरेथॉन स्पर्धेच्या माधमातून वसई तालुक्यातील ८३ गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्याचा विडा नंदाखाल येथील सोशल बिर्इंग या ग्रुपने उचलला आहे.
वसई तालुक्यातील नंदाखाल विरारमधील सोशल बिर्इंग या तरुणांच्या ग्रुपने मिनी मॅरेथॉन या क्रीडा प्रकाराला एक नवीन वळण दिले आहे. गरीब वस्त्यांचे आणि आदिवासी पाड्यांचे सबलीकरण फक्त शिक्षणानेच होऊ शकते.आणि आर्थीक अडचणींमुळे त्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात.असे चित्र स्पष्ट झाल्यामुळे सोशल बिर्इंगच्या तरुणांनी बॅसीन कॅथॅलिक बँक आणि किलबिल सामाजिक संघटनेच्या मदतीने तालुक्यातील ८३ गरीब आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भाग उचलला आहे.
प्रौढ पुरुषांच्या गटात लुबर्ट लोपीस, राजेश लोपीस, डेनिस डास, बेंजामीन परेरा आणि राजेश मिनेजीस यांनी बाजी मारली. स्त्रियांच्या गटात गीता आल्मेडा, रंजना लोपीस, कमल रिबेलो, शैला डिब्रिटो, आंजलमेरी डास यांनी बाजी मारली. ज्येष्ठ नागरीक पुरुषांच्या गटात पॅट्रीक रॉड्रीग्ज, जेकब डिकुन्हा, एलास लोपीस, इग्नेशिस रॉड्रीग्ज आणि बावतीस डिब्रिटो यांनी बाजी मारली. स्त्रियांच्या गटात मेरी थॉमस, संतान लोपीस, सिसिलिया लोपीस व मेरी मिनेझिस यांनी बाजी मारली. मॅल्सी मार्शल लोपीस या आठ वर्षांच्या मुलीने पाच किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याबद्दल कौतुक करण्यात आले. सर्व स्तरातील लोकांना क्रीडा आणि उपक्रमांद्वारे एकत्र आणून दुर्बल घटकांचे शिक्षण, कुपोषण तसेच आरोग्य बाबतच्या समस्या सोडवण्याचा सोशल बिर्इंगचा मानस आहे, अशी माहिती ग्रुपचे अध्यक्ष एरीक लोबो यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Good response to the Janhit Mini Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.