शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
3
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
4
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
5
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
6
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
7
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
8
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
9
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
10
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
11
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
12
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
13
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
14
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
15
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा
16
बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी!
17
Zeeshan Siddique: '१० कोटी दे नाहीतर तुला वडिलांसारखे मारून टाकीन'; झीशान सिद्दीकी यांना डी कंपनीकडून धमकी
18
अभिनेता टायगर श्रॉफच्या हत्येसाठी २ लाखाची सुपारी दिल्याचा दावा; एकावर गुन्हा दाखल
19
ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकन कंपनीलाच? अ‍ॅपलनंतर गुगलने घेतला मोठा निर्णय
20
रोहित पवारांना आणखी एक धक्का: नगरपालिका हातातून निसटली; कर्जतचा नवा नगराध्यक्ष कोण?

गुड न्यूज: ठाणे रिंग मेट्रोला केंद्राची मंजुरी; १२ हजार कोटींचा प्रकल्प; २०२९ पर्यंत पूर्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 07:40 IST

ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास दोन महिने अवकाश असताना केंद्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर कृपावर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुक्रवारी ठाणे शहराच्या अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. २०२९ पर्यंत पूर्ण होणारा हा प्रकल्प १२ हजार २०० कोटी रुपयांचा आहे. 

याबाबत केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, ठाणे शहराच्या अंतर्गत असलेल्या मेट्रो रेल्वेच्या मार्गाची लांबी २९ किमी आहे. या मार्गामुळे नौपाडा, वागळे इस्टेट, डोंगरीपाडा, हिरानंदानी इस्टेट्स, कोलशेत, साकेत इ. भाग जोडले जाणार आहेत. ठाणे पश्चिम येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २२ स्थानके असतील.

या प्रकल्पामुळे ठाणे शहराला वाहतुकीचे उत्तम साधन उपलब्ध होईल. १२ हजार २०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पात केंद्र व राज्य सरकारची समसमान भागीदारी असेल. तसेच या निधीतील काही रक्कम अन्य वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणार आहे. दरम्यान, पुणे मेट्रो फेज-१ प्रकल्पाच्या सध्याच्या पीसीएमसी-स्वारगेट मेट्रो लाइनच्या स्वारगेट-ते-कात्रज भूमिगत लाइन विस्ताराला मंजुरी देण्यात आली आहे. हा नवीन विस्तार लाइन-१ बी या नावाने ओळखला जाईल व या मार्गाचा ५.४६ किमीपर्यंत विस्तार केला जाईल. त्यात तीन भूमिगत स्थानके असणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, महाराष्ट्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्याच भावनेतून ठाणे शहरात अंतर्गत रिंग मेट्रो रेल्वे मार्ग उभारण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रो फेज-१च्या विस्तारीकरणालाही मंजुरी देण्यात आली. पुणे हे देशातील महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. त्याचा विकास करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.

  • पुण्यातील मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज परिसरातील ठिकाणे या मार्गाने जोडली जाणार आहेत. 
  • हा प्रकल्प फेब्रुवारी २०२९ पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी २९५४.५३ कोटी रुपये खर्च येणार आहे. 
  • बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यातील दोन कॉरिडॉरच्या बांधणीसही केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यामुळे त्या शहरातील मेट्रो वाहतूकही अधिक विस्तारणार आहे.
टॅग्स :Metroमेट्रोthaneठाणेprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीEknath Shindeएकनाथ शिंदे