शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये भिवंडीत होते अच्छे दिन- अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:52 IST

जनसंघर्ष यात्रेचा समारोप; केंद्र सरकारच्या धोरणांमुळे पॉवरलूम आले धोक्यात

भिवंडी : काँग्रेसच्या राज्यात भिवंडीमध्ये अच्छे दिन होते. येथील पॉवरलूम व्यावसायिकांसाठी वीज युनिटचे दर कमी केले होते. तर बँक कर्ज माफ केले. वीजबिलात सबसीडी दिली होती. मात्र जीएसटी व वीजदरवाढीने या व्यवसायाचा कणा मोडला. हा व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी काँग्रेस सत्तेत येणे आवश्यक आहे,असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.राज्यात काँग्रेसतर्फे सुरू झालेल्या जनसंघर्ष यात्रेचा समारोप भिवंडीत झाला. या प्रसंगी व्यासपीठावर खासदार हुसेन दलवाई, आमदार आरीफ नसीम खान, आमदार हरिभाऊ राठोड,पक्षाचे प्रभारी पी. संदीप, माजी खासदार सुरेश टावरे,सरचिटणीस प्रदीप रांका, शहराध्यक्ष शोएब खान आदी उपस्थित होते. भाजपा सरकारवर त्यांनी टीका केली. जनसंघर्ष यात्रा १२४ तहसील क्षेत्रातून ६५०० किलोमीटर अंतरामध्ये विविध ठिकाणी जनसभा घेतल्याचे ते म्हणाले.दरम्यान, महापालिकेत काँग्रेसचे ४७ नगरसेवक आहेत. परंतु गटबाजीमुळे शहराध्यक्षाच्या गटातील नगरसेवक समारोप यात्रेत सहभागी झाले होते. या गटबाजीमुळे भाषण सुरू असतानाच सभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी मैदानातून बाहेर पडायला सुरूवात केली. चव्हाण यांचे भाषण संपेपर्यंत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या झाल्या होत्या. यावेळी पक्षाचे अन्य पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात निघालेल्या बाईकरॅलीमुळे काहीकाळी वाहतूककोंडी झाली होती.एलईडी स्क्रीन कोसळलासभा सुरू असताना मैदानात वेगाने वारा सुरू होता. खा. चव्हाण हे कार्यक्रम संपवून गाडीत बसत असतानाच मैदानातील एलईडी स्क्रीन कोसळळा. यामध्ये कर्मचारी जखमी झाला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा