घोलवडच्या बलात्काऱ्यास हरियाणात केली अटक
By Admin | Updated: May 8, 2017 05:51 IST2017-05-08T05:51:52+5:302017-05-08T05:51:52+5:30
तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सुनील रामचंद्र लोहार यास घोलवड पोलिसांनी हरियाणा येथून

घोलवडच्या बलात्काऱ्यास हरियाणात केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू/बोर्डी : तेरा वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या सुनील रामचंद्र लोहार यास घोलवड पोलिसांनी हरियाणा येथून अटक केली. या बाबतची फिर्याद तिच्या आईने जुलै २०१६ रोजी घोलवड पोलिसात नोंदवली होती.
ही मुलगी बोर्र्डी येथील रहिवासी होती. तिला घोलवड येथील हॉटेलात काम करणाऱ्या सुनीलने पळवून नेली होती. त्यानंतर तो तिच्या आईला फोनवरून धमकी द्यायचा. त्याच्या मोबाईलच्या लोकेशनवर पाळत ठेऊन पोलिसांनी त्याला हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून आरोपीला १ मे ला अटक करून तिची सुटका केली. या काळात तिच्यावर तिच्यावर तो लैंगिक अत्याचार करीत होता. त्याच्यावर अपहरण आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ४ मे रोजी डहाणू न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी काळे, हवालदार गुरु दत्त डवले, पोलीस संतोष काळे व सविता आहेर यांनी प्रभारी अधिकारी दुर्गेश शेलार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी केली.
अपहरण व पोस्को अंतर्गत आरोपीला हरियाना येथून अटक केली असून डहाणू न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
- दुर्गेश शेलार, प्रभारी अधिकारी, घोलवड पोलीस ठाणे