शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

७१ लाखांचे दीड किलोचे सोन्याचे दागिने लुबाडले, नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा, आरोपी पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 15:12 IST

पवन गोल्ड फर्मचे मालक जयेश यांचा मोठा भाऊ राजेंद्र रावल हा झवेरी बाजार येथे रिंकार ज्वेलर्स आणि इतर ज्वेलर्सकडे कमिशनवर कामाला आहे.

ठाणे : गुजरातला सोन्याचे दागिने पुरवठा करण्याच्या बहाण्याने राजेश पारेख याने जयेश रावल (३५) यांचे ७१ लाख १८ हजार ४९१ रुपयांचे ११५९.५९० वजनाचे सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावल यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

पवन गोल्ड फर्मचे मालक जयेश यांचा मोठा भाऊ राजेंद्र रावल हा झवेरी बाजार येथे रिंकार ज्वेलर्स आणि इतर ज्वेलर्सकडे कमिशनवर कामाला आहे. तो २०१५ मध्ये रॉयल चेन फर्म, झवेरी बाजार येथे कामाला असताना त्यांची ओळख राजेश पारेख याच्याबरोबर झाली. त्याने सुरुवातीला दीड किलो सोन्याचे दागिने गुजरातला पाठविण्यासाठी खरेदी केले. त्याचे पैसेही त्याने रोख स्वरूपात दिले. जानेवारी २०२३ पासून त्याच्याशी राजेंद्र रावल यांची चांगली ओळख झाली. यातूनच त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर  राजेश  याने त्याला १,२०० ग्रॅम दागिने पाहिजे असून ते गुजरातला पाठवायचे सांगितले. 

- राजेंद्र यांनी त्याला झवेरी बाजारातून सोने खरेदी करून दिले. ते दागिने २ जुलै २०२३ रोजी तीन हात नाका येथील  शरणम हॉटेल येथे त्याला दिले.- त्याला ७१ लाख १८ हजार ४९१ रुपयांचे २२ कॅरेटचे कानातील बुटी, गळ्यातील हार, लेडीज ब्रेसलेट, लेडीज अंगठी आणि नेकलेस असे ११५९.५९०  वजनाचे सोन्याचे दागिने पारेख बंधूंनी दिले. हे दागिने त्याने परत केले नाहीत. पैसेही दिले नाहीत. - शिवाय, राजेश पारेख याला गायब करून, मारून टाकीन किंवा आत्महत्या करून तुमच्या नावाचे पत्र लिहून ठेवेन, अशी धमकीच त्याला दिली. या सर्व प्रकाराला कंटाळल्यानंतर जयेश रावल यांनी राजेश पारेख याच्याविरुद्ध फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा १ जानेवारी रोजी दाखल केला आहे. 

टॅग्स :GoldसोनंThiefचोरRobberyचोरीPoliceपोलिस