अमित ठाकरे यांना मनविसेचे अध्यक्षपद द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST2021-07-22T04:25:17+5:302021-07-22T04:25:17+5:30
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळणारे आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी आता अमित ...

अमित ठाकरे यांना मनविसेचे अध्यक्षपद द्या
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद सांभाळणारे आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी आता अमित ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ठाण्यातून जोर धरू लागली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने राज ठाकरे यांना तसे पत्रदेखील लिहिले आहे.
अमित हे ठाकरे कुटुंबातील सदस्य असले तरी त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात, त्यांनी एक कार्यकर्ता म्हणून केली आहे. गावापाड्यात जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणे, शिक्षणासाठी तरुणांच्या पाठीशी उभे राहणे, पक्षाच्या सभेत नेता म्हणून नाही तर एक सर्वसामान्य ‘कार्यकर्ता’ म्हणून उभे राहून भाषण ऐकून त्यांनी आपला साधेपणा सिद्ध केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य कार्यकर्त्यांना काम करण्याची एक नवी ऊर्जा व दिशा मिळू शकते, असे विद्यार्थी सेना ठाणे शहर अध्यक्ष किरण पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे.