ठाणे : एका १७ वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला आत्महत्या करण्याची धमकी देऊन विनयभंग करणा-या लंकेश गिरी (१९, रा. वाघबीळ, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. त्याला १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.घोडबंदर रोड परिसरातील या मुलीच्या घराजवळील एका मेडिकलच्या दुकानात तो कामाला आहे. घरी औषधे मागविल्यामुळे त्याला तिचा मोबाइल क्रमांक मिळाला होता. मार्च २०१८ पासून तो तिचा पाठलाग करीत होता. ‘तुझ्यावर प्रेम आहे, तू खूप आवडतेस’ असे त्याने सांगितल्यानंतर तिने स्पष्ट नकार देऊनही त्याने तिच्या शाळेपर्यंतही पाठलाग केला. तिच्या नकारामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याची त्याने तिला धमकी दिली. या प्रकाराला कंटाळून तिने अखेर त्याच्याविरुद्ध १६ आॅगस्ट रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी त्याला अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले यांनी सांगितले.-------------------------
आत्महत्येची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:52 IST
एकतर्फी प्रेमाला नकार देऊनही वारंवार अल्पवयीन मुलीचा पिच्छा करुन तिला आत्महत्येची धमकी देत विनयभंग करणा-या लंकेश गिरी या रोडरोमियोला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
आत्महत्येची धमकी देऊन तरुणीचा विनयभंग करणाऱ्यास ठाण्यात अटक
ठळक मुद्देठाण्याच्या घोडबंदर रोडवरील घटनाऔषध खरेदीतून ओळखकासारवडवली पोलिसांनी केली कारवाई