मुंब्रा : साडेतीन वर्षांचा चिमुरडा वडिलांकडे जाण्याचा हट्ट करत असल्याने त्याला मारहाण करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे.मुंब्रा बायपासजवळ अम्मार बिल्डिंगमध्ये राहणाºया फय्याज खान यांचे हिना या महिलेशी दुसरा विवाह केला होता. सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे तिने घटस्फोट घेतला. मुलाच्या पालनपोषणासाठी फय्याज यांनी या महिलेला दरमहिना पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले. मात्र हिना जादा पैशाची मागणी करत होती. त्यातच मुलगा सतत वडिलांकडे जाण्याचा हट्ट करत होता.नुकताच तिने मुलाला मारहाण करतानाचा व्हिडीओ मोबाइलद्वारे काढून तो तिच्या सावत्र मुलीला पाठवला. या प्रकारामुळे उद्विग्न झालेल्या फय्याज यांनी पोलिसांकडे तक्रार दिला. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी हिनाला अटक केली आहे.
चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या आईला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 01:58 IST