माजी मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 06:53 IST2019-05-11T06:53:17+5:302019-05-11T06:53:41+5:30

भाईंदरच्या नवघर गावात राहणाऱ्या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या घरात तेथेच काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Girl suicide in Bhaynder | माजी मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात तरुणीची आत्महत्या

माजी मनसे पदाधिकाऱ्याच्या घरात तरुणीची आत्महत्या

मीरारोड - भाईंदरच्या नवघर गावात राहणाऱ्या मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याच्या घरात तेथेच काम करणाऱ्या 24 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी हा प्रकार घडला. नवघर गावात राहणारे संदीप सदानंद पाटील हे पालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार तसेच शाखाध्यक्ष होते. सद्या मनसैनिक म्हणून कार्यरत आहेत. 

त्यांना दोन जुळ्या मुली असून तळ मजल्यावर ते राहतात तर वरच्या मजल्यावर क्लिप पॅकिंगचे त्यांचे काम चालते. त्यांच्या कडे कामाला प्रतीक्षा अजय चौधरी (24) रा. तलाव मार्ग ही तरुणी गेल्या चार वर्षां पासून संदीप कडे व्यवसायाचे व घरकाम असे दोन्ही करते.  सायंकाळी संदीप बाहेरुन घरी असता  पहिल्या मजल्यावर प्रतीक्षा ही ओढणीने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी नवघर पोलिसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करत तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अजून पोलीसांनी स्पष्ट केलेले नाही.

Web Title: Girl suicide in Bhaynder