ठाण्यात आठवीच्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 19:42 IST2023-01-12T19:41:33+5:302023-01-12T19:42:22+5:30
जितेंद्र कालेकर ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या लॅन्डमार्क या सोसायटीमधील ६०३ क्रमांकाच्या सदनिकेतील इशिका विकास जांगीड या ...

ठाण्यात आठवीच्या मुलीने गळफास घेऊन केली आत्महत्या
जितेंद्र कालेकर
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्यास असलेल्या लॅन्डमार्क या सोसायटीमधील ६०३ क्रमांकाच्या सदनिकेतील इशिका विकास जांगीड या १३ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला आहे.
इंदिरा जागीड यांची नात इंशिका हिने ११ जानेवारी रोजी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास घरातील बेडरुमच्या सिलिंग फॅनला नायलॉनची दोरी बांधून आत्महत्या केली. हा प्रकार कुटूबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड, विजय मुतडक आणि उपनिरीक्षक पी. ए. लहाने आदींनी भेट देऊन पाहणी केली. मात्र, आत्महत्येपूर्वी घरात तिने कसलीही चिठ्ठी लिहिली नसल्याचे आढळले. ती घोडबंदर रोड येथील श्री मा विद्यालयात इयत्ता आठवीमध्ये शिकत होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी सांगितले.