शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पोटाची खळगी भरताना स्व: रक्षणासाठी मुलगी झाला मुलगा; ८ महिन्यानंतर पोलीस चौकशीत सत्य आले जगासमोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 17:17 IST

Police News : लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली.

ठळक मुद्देछाया दशरथ माने ( वय २१ रा.हडपसर पुणे ) असे मुलगा बनून वावरणाऱ्या मुलीचे नाव आहे.

नितिन पंडीतभिवंडी - सध्याच्या जगात मुली अथवा महिला सुरक्षित नसल्याचे अनेक अत्याचाराच्या प्रकरणातून दररोज समोर येत असतात. त्यातच गरिबीमुळे घर सोडून मुंबईस कामाच्या शोधत आलेली मुलगी भिवंडीत तब्बल आठ महिने मुलगा बनून मिळेल ते काम करून गुजराण करीत असल्याचे पोलिसांनी  संशय वरून ताब्यात घेतलेल्या मुलाची चौकशी करीत असताना तो मुलगा नसून मुलगी असल्याचे बिंग फुटले त्यामुळे पोलीस यंत्रणा ही चक्रावून गेली. छाया दशरथ माने ( वय २१ रा.हडपसर पुणे ) असे मुलगा बनून वावरणाऱ्या मुलीचे नाव आहे.          

घरची हलाकीची आर्थिक परिस्थिती असल्याने पैसे कमविण्यासाठी छायाने पुण्यातील घर सोडले व मुंबईची वाट धरली .पण मुंबई मध्ये काम न मिळाल्याने तिने भिवंडी शहर गाठले .भिवंडीत मिळेल ते मोलमजुरीचे काम करून तिने आपली गुजराण सुरू केली . काम न मिळाल्यास कोणी दिलेल्या भाकर तुकड्यावर आपली भूक भागविली .भिवंडीत तब्बल आठ महिन्यांपासून छाया ही मुलगा बनून  वावरत होती. परंतु लॉकडाऊन असल्याने तिला काम काही मिळालं नाही. तरी तिने जिद्द सोडली नाही जे काही काम मिळेल ते काम ती करायची तसेच राहण्याची सोय नसल्याने इमारतीच्या आडोशाला ती झोपायची. आशा परिस्थितीत वावरताना स्वतःचे रक्षण कसे करावे हा प्रश्न तिला सतावत असताना तिने शक्कल लढवली अन् मुलगा बनली. स्वतःचे नाव तिने समीर शेख असल्याचे सांगू लागली .त्यासाठी तिने स्वतःची वेशभूषा देखील बदलून मुलांसारखे केस लहान केले, त्यामुळे परिसरात कोणीही तिला मुलगी म्हणून ओळखू शकलं नाही.       

दरम्यान लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. परंतु समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी या मुलास पोलीस ठाण्यात आणून त्याकडे कसून चौकशी सुरू केली असता हे सत्य समोर आलं की तो मुलगा नसून ती मुलगी आहे. हे समजल्यावर पोलीसही चक्रावले. पोलिसांनी तिच्याकडून माहिती काढत तिचा घरचा पत्ता घेतला. ती पुणे, हडपसर परिसरात राहत असून तिचे खरे नाव छाया माने आहे हे स्पष्ट झाल्यावर शांतीनगर पोलिसांनी हडपसर पोलीस ठाण्यात चौकशी केली असता छाया ही आठ महिन्या पासून बेपत्ता असल्याचे व त्या बाबत कुटुंबियांची तक्रार ही दाखल असल्याचे समजले तेव्हा पोलिसांनी दोन दिवसांच्या प्रयत्नानंतर तिच्या आई-वडिलांचा शोध घेऊन त्यांना भिवंडीत पाचारण केले व छाया हिस तिच्या कुटुंबियां कडे सुखरूप स्वाधीन केले आहे .

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिसFamilyपरिवारMumbaiमुंबईthaneठाणे