शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन - गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 23:58 IST

राज्यातील भारनियमनासाठी जलसंपदा मंत्र्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दोषी धरले. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विजेची जास्त मागणी होती.

डोंबिवली : राज्यातील भारनियमनासाठी जलसंपदा मंत्र्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दोषी धरले. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विजेची जास्त मागणी होती. ही समस्या सगळीकडेच आहे. मात्र केंद्राकडूनच कोळसा येण्यास विलंब होत असल्याने महाराष्टÑात भारनियमनाचा प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट करून, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी १० ते १२ दिवसांत ही समस्या सोडविली जाईल, अशी माहिती येथे दिली.डोंबिवली येथे एका प्रकल्पाचा शुभारंभ महाजन यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्टÑाचा कोळसा ज्या ठिकाणी निवडणुका आहेत, त्या ठिकाणी वळविला जात आहे, या आरोपाचे त्यांनी खंडण केले. राज्यातील ४० टक्के आमदार, खासदारांची कामे बरोबर नसल्याचा अहवाल अलीकडेच प्रसिद्ध झाला. त्यावर महाजन म्हणाले की, याबाबत सोशल मीडियावर केवळ टाइमपास सुरू आहे. प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. हा खोडसाळपणा जाणीवपूर्वक केला जात आहे.महाराष्टÑाच्या दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात केवळ २६ टक्के पाणीसाठे शिल्लक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री राज्यभरात बैठका घेत आहेत. यासंदर्भात औरंगाबाद येथे नुकतीच बैठक पार पडली. सरकार या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजन