शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

२५० वर्षांचा इतिहास असलेले घंटाळी देवी मंदिर; ठाणेकरांचे श्रद्धास्थान घंटाळी देवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 09:45 IST

प्रज्ञा म्हात्रे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील आणखी एक जागृत देवस्थान म्हणून घंटाळी देवी मंदिराची ख्याती आहे. जवळपास ...

प्रज्ञा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील आणखी एक जागृत देवस्थान म्हणून घंटाळी देवी मंदिराची ख्याती आहे. जवळपास २५० हून अधिक वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या या मंदिरात ठाणे शहरातूनच नव्हेतर, परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सवात या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची वर्दळ असते. १८८० सालच्या गॅझेटमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. गेल्या चार वर्षांपासून हिंदू जागृती न्यासाकडे या मंदिराचे व्यवस्थापन आहे आणि त्यांच्या माध्यमातून २१ उपक्रम राबविले जातात.

घंटाळी मंदिर हे शहरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे केंद्र झालेले आहे. घंटाळी देवी, महिषासुरमर्दिनी आणि दुर्गादेवी या तीन देवी एकाच पाषाणावर प्रगट झाल्या. 

अष्टमीला नवचंडी याग    देवीच्या आजूबाजूचा परिसर घंटाळी देवी मार्ग या नावाने ओळखला जातो. या मंदिराच्या बाजूला एक मोठे तळे होते आणि तळ्याच्या काठावर या देवी प्रगटल्याची कथा आहे.     हिंदू जागृती न्यासाकडे या मंदिराचे व्यवस्थापन आल्यावर त्यांनी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. पंचमीला या मंदिरात कुमारिका पूजन केले जाणार आहे.     १०१ कुमारिकांची यात पूजा केली जाईल. या वर्षीपासून दरवर्षी हा उपक्रम राबविण्याचा मानस ओक यांनी व्यक्त केला.     अष्टमीला २२ ऑक्टोबर रोजी नवचंडी याग होणार आहे. हिंदू जागृती नवरात्र मंडळ व घंटाळी मंदिर व्यवस्थापन समिती आयोजित कुंकुमार्चन कार्यक्रम रविवारी होणार आहे.

नवरात्रोत्सवात रोज पाच हजार भाविक येतात दर्शनासाठीया देवीला नवस बोलणारे भाविक नवस फेडताना घंटा बांधतात म्हणून या देवीला ‘घंटाळी देवी’ असे नाव प्रचलित झाले. या मंदिरात तीन गाभारे असून, एका गाभाऱ्यात तीन देवी तर दुसऱ्या गाभाऱ्यात राम आणि तिसऱ्या गाभाऱ्यात शंकराचे मंदिर आहे. देवीचे आणि शंकराचे गाभारे हे पूर्णपणे दगडी बांधकामात केलेले आहेत, अशी माहिती हिंदू जागृती न्यासाचे अध्यक्ष मंगेश ओक यांनी दिली. नवरात्रोत्सवात दर दिवशी पाच तर मंगळवार, शुक्रवार, पंचमी आणि अष्टमीला दर दिवशी दहा हजार भाविक  येतात. या मंदिराला पेशव्यांकडून दरवर्षी वर्षासन होते, असेही ओक यांनी सांगितले.