शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

पाठिंबा मिळाला, पण मते मिळतील?, मनसेकडून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:22 AM

लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे.

कल्याण : लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण मतदारसंघात राष्ट्रवादीला मनसेची साथ लाभल्याचे चित्र दिसत असले तरी मनसेचे मतदार राष्ट्रवादी उमेदवाराच्या पारड्यात मतांचे दान टाकतील का, याबाबत मात्र साशंकता आहे. या मतदारसंघात मनसेची सव्वा लाखाच्या आसपास मते आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विरोध म्हणून राष्ट्रवादीसाठी मनसे प्रचारात उतरली असली तरी मतदारांचे मन वळवण्यात मनसेचे पदाधिकारी यशस्वी होतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या दोन्ही निवडणुका मनसेने लढवल्या होत्या. त्यात मनसेला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असली तरी या मतदारसंघात सव्वा लाखाच्या आसपास मनसेची मते आहेत. २०१४ च्या निवडणुकीत डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतून अनुक्रमे २६ हजार ५३९ आणि ३१ हजार ४८४ मते मनसेच्या उमेदवाराला मिळाली होती. कल्याण पूर्व आणि अंबरनाथ मतदारसंघातही २१ हजारांच्या आसपास मते मिळाली होती. या मतदारसंघातील प्रमुख शहरी भाग असलेल्या कल्याण आणि डोंबिवलीत मनसेचे १० नगरसेवक आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक डोंबिवलीतून निवडून गेले आहेत. त्यामुळे मनसेला मानणारा मतदार डोंबिवलीत आहे, हे नाकारून चालणार नाही. मोदी आणि शहांविरोधात सुरू असलेल्या प्रचारात याच मतदारसंघातील मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिल्याचे सोमवारच्या आघाडीच्या बैठकीतून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत आघाडी आणि पाठिंबा देणाºया पक्षांच्या दोन बैठका झाल्या आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम मात्र या बैठकांपासून अलिप्त राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यावरून मनसेत दोन गट पडले.

दरम्यान, राष्ट्रवादीला मनसेच्या काही पदाधिकाºयांनी साथ दिली असली तरी उमेदवार बाबाजी पाटील यांना मनसेचे मतदार स्वीकारतील का, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. पाटील यांच्या समर्थकांकडून भूमिपुत्राचा नारा दिला जात आहे. त्यात, नुकत्याच पार पडलेल्या आगरी-कोळी भूमिपुत्र महासंघाच्या बैठकीत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. पुरोगामी विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादीसारख्या पक्षातच जातीच्या आधारावर मागितला जात असलेला मतांचा जोगवा चर्चेचा विषय ठरला असताना कल्याण-डोंबिवलीतील मनसेचा मतदार राष्ट्रवादीला साथ देतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
>मोदी आणि शहा यांना विरोध करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. हे जर पुन्हा निवडून आले, तर सध्याची निवडणूक ही शेवटची ठरेल. पुढे आपल्याला हुकूमशाहीला सामोरे जावे लागेल. गेल्या पाच वर्षांतील भाजपचा कारभार पाहता नागरिक नाराज असून ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला मतदार नक्कीच साथ देतील. त्याचा फायदा राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना होईल, यात शंका नाही.- प्रल्हाद म्हात्रे, डोंबिवली शहरसंघटक, मनसे

टॅग्स :MNSमनसेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kalyan-pcकल्याण