शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कल्याण स्थानकातील बकालपणामुळे महाव्यवस्थापक नाराज; आठ दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 14:48 IST

स्थानकात सुधारणा करुन आठ दिवस फोटो पाठवण्याच्या सूचना

- अनिकेत घमंडीडोंबिवली: कल्याणरेल्वे स्थानकातील बकाली पाहून मध्य रेल्वेचे महाव्यस्थापक डी. के. शर्मा यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. लांब पल्ल्यासह उपनगरीय लोकल गाड्यांचे जंक्शन असलेल्या स्थानकात एवढी बकाली का?, असा सवाल करत त्यांनी स्थानक प्रशासनासह सफाई अधिकारी आणि विभागीय व्यवस्थापकांना विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. टिटवाळा स्थानकात रेल्वेच्या हद्दीत येणाऱ्या रिक्षांना तातडीने मज्जाव करावा, त्या ठिकाणी तात्काळ बॅरिकेड्स लावावेत असे आदेश त्यांनी दिले.मध्य रेल्वेच्या कल्याण टिटवाळा सेक्शनच्या महाव्यवस्थापकांनी शनिवारी पाहणी दौरा केला. सकाळी ८.४० वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा इन्स्पेक्शन ट्रेनने कल्याण स्थानकात आला. स्थानकात आल्यावर त्यांनी पादचारी पूल, वॉटर व्हेंडींग मशिन, तिकिट घर यासह फलाटांची पाहणी करत प्रचंड नाराजी व्यक्त केली. स्थानकातील विविध फलाटांमध्ये असलेली बकाली, दुर्गंधी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत स्वच्छता राखा, वरवर, दिखाव्यासाठी कामे करू नका असे सांगत स्थानक प्रशासन, स्वच्छता अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.पादचारी पूलापासून जेथे स्काय वॉक आहेत, त्या भागामधून फेरीवाल्यांना हटवा, अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. वॉटर व्हेंडींग मशिनजवळ साचलेल्या पाण्याबद्दलही महाव्यस्थापक डी. के. शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली. पिण्याच्या पाण्याजवळ जर एवढी बकाली असेल, तर मग प्रवाशांना चांगले पाणी देण्याची जबाबदारी कोणाची? केवळ आम्ही येणार म्हणून स्वच्छता राखू नका, कायमच स्वच्छता ठेवा. स्वच्छतेसह ज्या सूचना दिल्या त्याबाबत काय सुधारणा केल्या त्याचे दोन दिवसांपासून आठ दिवसांपर्यंतचे विविध वेळांमध्ये काढलेले फोटो पाठवा असे आदेश त्यांनी विभागीय व्यवस्थापक जैन यांना दिले.कल्याण स्थानकाची पाहणी केल्यानंतर शर्मा यांनी शहाड, आंबिवली स्थानकांसह मार्गाचा पाहणी दौरा केला. त्या पाहणीत त्यांनी काही सूचना अभियांत्रिकी विभागाला दिल्या. त्यानंतर सकाळी ९ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास ते टिटवाळा स्थानकात आले. तेथे आल्यावर त्यांनी कल्याण दिशेकडील पादचारी पूलाचे काम जलद करावे, तसेच मधला पूल आहे त्याची काही ठिकाणी डागडुजी आहे, तीदेखील करण्यात यावी असे म्हटले. त्याच दरम्यान आलेल्या एका लोकलमुळे मधला पादचारी पूलावर झालेली गर्दी, कोंडी त्यांनीही अनुभवली. ते म्हणाले की, काही काळानंतर त्या पूलाची रूंदी वाढवण्याच्या दृष्टीनेही विचार करण्यात यावा, पूलावर हवा खेळती राहण्यासाठी विशेष सुविधा कराव्यात असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी टिटवाळा स्थानकाच्या पूर्वेला येत तिकिट घराच्या ठिकाणी पाहणी केली. तेथेही संरक्षक भिंत बांधून घ्यावी आणि जेथून शॉर्टकट आहेत ते सगळे बंद करावेत अशा सूचना दिल्या. पश्चिमेलाही संरक्षक भिंत बांधावी जेणेकरून कोणीही रूळ ओलांडणार नाही आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी उपाययोजना करावी असे सूचित केले. तसेच कसारा एन्डलाही पादचारी पूलाचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीrailwayरेल्वे