भिवंडी मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च, पोलीस निरीक्षक दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: May 5, 2024 22:43 IST2024-05-05T22:42:41+5:302024-05-05T22:43:59+5:30

तीनही निरीक्षक भिवंडी मतदारसंघात दाखल झाले आहेत.

General, Expenditure, Police Inspector admitted in Bhiwandi Constituency | भिवंडी मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च, पोलीस निरीक्षक दाखल

भिवंडी मतदारसंघात सर्वसाधारण, खर्च, पोलीस निरीक्षक दाखल

ठाणे : निवडणूक आयोगाने भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक व पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक मतदारसंघात दाखल झाले असून त्यांनी कामकाजाला सुरूवात केली आहे. त्यांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारांसह त्यांच्या प्रतिनिधींना, नागरिकांना दिलेल्या वेळेत भेट धेता येणार आहे. भिवंडी मतदारसंघासाठी सर्वसाधारण निरीक्षक म्हणून राजनवीर सिंग कपूर , खर्च निरीक्षक चित्तरंजन धंगडा माझी आणि पोलीस निरीक्षक म्हणून के. जयरामन यांची आयोगाने नियुक्ती केली असून हे तीनही निरीक्षक भिवंडी मतदारसंघात दाखल झाले आहेत. 

या निरिक्षकांना उमेदवारांना, मतदारसंघातील नागरिकांना भेटता येणार आहे. त्यास अनुसरून कपूर यांना उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय, ठाणे रोड, गुलजार नगर, भिवंडी, येथे दुपारी १२ ते १ या वेळेत भेटता येईल. पोलीस निरीक्षक जयरामन यांना एम.एस.टी.सी.एल. रेस्ट हाऊस, पहिला मजला, पडघा, ता.भिवंडी येथे दुपारी ४ ते सायंकाळी ५ या वेळेत भेटता येईल. यावेळेत निवडणूक खर्च निरीक्षक माझी, यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, भिवंडी येथे भेटता येणार आहे.

Web Title: General, Expenditure, Police Inspector admitted in Bhiwandi Constituency

टॅग्स :thaneठाणे