गायमुख खाडीतून रेतीचोरी; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

By Admin | Updated: October 10, 2016 03:29 IST2016-10-10T03:29:11+5:302016-10-10T03:29:11+5:30

गायमुख खाडीतून रेतीची चोरी करणाऱ्या टोळीतील १२ आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. जवळपास १० लाख रुपयांचा

The Gayatri Cave from Sattichori; Capture millions | गायमुख खाडीतून रेतीचोरी; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

गायमुख खाडीतून रेतीचोरी; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे : गायमुख खाडीतून रेतीची चोरी करणाऱ्या टोळीतील १२ आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी शनिवारी गुन्हे दाखल केले. जवळपास १० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी शनिवारी दुपारी केलेल्या संयुक्त कारवाईमुळे गायमुख खाडीतून होणाऱ्या रेतीचोरीचा प्रकार उघडकीस आला. कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी रामदास काठे, चंद्रकांत पाटील, राहुल पाटील, पुरुषोत्तम पाटील, अविनाश पाटील, अनिल पाटील, बारक्या गंगाराम भगत, काशिनाथ सुकऱ्या कारभारी, उत्तम विनायक ठाकूर, संतोष केशव पाटील, नितीन तुळशीराम पाटील, विजय अनंत पाटील आणि अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनास्थळावरून ७ हजार रुपये प्रतिब्रासप्रमाणे १४९ ब्रास रेती पोलिसांनी जप्त केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळेकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The Gayatri Cave from Sattichori; Capture millions