उल्हासनगरात गावठी दारू अड्ड्यावर धाड, ६७ हजारांची दारू जप्त

By सदानंद नाईक | Updated: October 9, 2023 15:41 IST2023-10-09T15:40:08+5:302023-10-09T15:41:01+5:30

उल्हासनगर शेजारील मांगरूळगाव हद्दीतील तलाव परिसरात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती.

Gavathi liquor store raided in Ulhasnagar, liquor worth 67,000 seized | उल्हासनगरात गावठी दारू अड्ड्यावर धाड, ६७ हजारांची दारू जप्त

उल्हासनगरात गावठी दारू अड्ड्यावर धाड, ६७ हजारांची दारू जप्त

उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांगरूळगाव तलाव परिसरातील गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी रविवारी धाड टाकून ६७ हजार ४०० रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात सचिन नामदेव पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

उल्हासनगर शेजारील मांगरूळगाव हद्दीतील तलाव परिसरात गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली होती. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या दरम्यान हिललाईन पोलिसांनी धाड टाकली असता गावठी दारूची भट्टी चालवित असतांना आढळून आले.

गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य यावेळी पोलिसांच्या हाती लागली असून त्या मुद्देमालाची किंमत ६७ हजार ४०० रुपये आहे. याप्रकरणी सचिन नामदेव पाटील यांच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Gavathi liquor store raided in Ulhasnagar, liquor worth 67,000 seized