भिवंडीत गॅस टँकरला आग;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प
By नितीन पंडित | Updated: September 20, 2023 16:33 IST2023-09-20T16:33:15+5:302023-09-20T16:33:28+5:30
भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर सोनाळे गावाच्या हद्दीत नाशिक कडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एचपी गॅस ने ...

भिवंडीत गॅस टँकरला आग;सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक एक तास ठप्प
भिवंडी: मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर सोनाळे गावाच्या हद्दीत नाशिक कडून मुंबईच्या दिशेने निघालेल्या एचपी गॅस ने भरलेला टँकरच्या टायरने अचानक पेट घेतल्याने गॅस टॅंकरला आग लागल्याची घटना बुधवारी घडली आहे. रस्त्यात मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने टँकर चालकाने सतर्क होऊन टँकर रस्त्याच्या कडेला उभा केला होता,त्यामुळे पुढील अनर्थ टळला असून अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टाळली आहे.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनेची माहिती मिळताच रांजनोली नाका येथील वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भिंगारदिवे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत या मार्गा वरील वाहतूक थांबवून ठेवली होती.त्यांनतर भिवंडी अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत टँकरला लागलेली आग आटोक्यात आणली.या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक एक तास विस्कळित झाली होती.त्यानंतर वाहतूक पोलिसांनी दोन्ही मार्गावरील वाहतूक हळूहळू सुरू केली.