फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या गाड्यांतून हाेत आहे कचरा वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 23:01 IST2020-12-31T23:01:03+5:302020-12-31T23:01:08+5:30
कोट्यवधींची बिले : कंत्राटदाराविरुद्ध तक्रारी असूनही कार्यवाही शून्य

फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या गाड्यांतून हाेत आहे कचरा वाहतूक
धीरज परब
मीरा राेड : मीरा-भाईंदर महापालिकेने शहरातील कचरा व अंतर्गत गटार सफाईचे काम हे १ मे २०१२ रोजी मे. ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंटला पाच वर्षांसाठी दिले होते. त्यामुळे त्याची मुदत एप्रिल २०१७ मध्ये संपल्यानंतर पावणेचार वर्षांपासून मुदतवाढ देत आहे. मुंबई महापालिकेने अपात्र ठरवलेल्या या कंत्राटदाराविरुद्ध अनेक तक्रारी व आरोप होऊनही कार्यवाही होत नाही.
त्याच्यामार्फत कचरा वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक गाड्या या जुन्या, नादुरुस्त तसेच फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या आहेत. तरीही याच गाड्या चालवून कोट्यवधीची बिले दिली जातात. या गाड्यांवर जीपीएस यंत्रणा असल्याचा पालिकेचा दावाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. गाड्या या पालिकेच्या की कंत्राटदाराच्या हितासाठी चालवल्या जातात, असा प्रश्न निर्माण होतो .
सुका, ओला, औद्याेगिक कचऱ्यावर होणारी प्रक्रिया नाममात्र
उत्तनच्या धावगी डोंगरावर सरकारी जागेत घनकचरा प्रकल्प उभारला आहे. तेथे सुका, ओल्या व औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत व सुक्या कचऱ्यापासून जळाऊ इंधन तयार केले जाते, असे पालिकेचे म्हणणे आहे.