शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

मीरा-भाईंदर मध्ये उघड्यारील कचरा कुंड्यां मुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 18:26 IST

मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड -मीरा भाईंदर महापालिका शून्य कचरा कुंडीचे शहर म्हणून मिरवत असली तरी प्रत्यक्षात मात्र ते तद्दन खोटे आहे. कारण शहरात ठिकठिकाणी उघड्यावरील कचरा कुंड्या मोठ्या प्रमाणात असून पालिकेचे कर्मचारी तसेच परिसरातील रहिवाशी कचरा आणून टाकत आहेत. त्यामुळे घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून रोगराईचा धोका कायम आहे. 

मीरा भाईंदर महापालिका हि स्वच्छ भारत सर्वेक्षणात शासन स्तरावर शहर कचराकुंडी मुक्त शहर असल्याचा दावा करते . शहरात कचरा कुंडी नसल्याचे खोटे सांगून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात पालिकेचा हातखंडा आहे . परंतु प्रत्यक्षात मात्र शहरात ठिकठिकाणी आजही कचरा कुंड्या कायम आहेत . शहरातील झोपडपट्टी व गावठाण भागातच नव्हे तर इमारती क्षेत्रात देखील कचरा कुंड्या सर्रास सुरु आहेत . 

वास्तविक महापालिकेने कचरा गोळा करण्यासह साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदाराने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे अपेक्षित असताना झोपडपट्ट्या, गावठाण व चाळी क्षेत्रात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. तर ज्या ठिकाणी कचरा गोळा केला जातो तो एकत्र आणून त्याच भागातील एखाद्या मोकळ्या जागेत टाकला जातो . तर काही ठिकाणी परिसरातील रहिवाशी कचरा आणून जवळच्या मोकळ्या जागेत टाकत असतात . 

ओला व सुका कचरा वर्गीकरण न करताच एकत्र आणून रस्त्या व मोकळ्या जागेत टाकला जात असल्याने त्या बेकायदा कचरा कुंड्यांच्या ठिकाणी कचरा सर्वत्र अस्ताव्यस्त पसरतो. त्यावर मोकाट गुरं , श्वान गोळा होतात. कचरा सर्वत्र पसरतो आणि दुर्गंधी पसरते. परिसरात घाणीचे साम्राज्य असते. उत्तन , मोरवा , गणेश देवल नगर आदी भागात तर कांदळवनातच पालिकेने अश्या बेकायदा कचरा कुंड्या चालवल्या आहेत. 

शहरातील ह्या कचरा कुंड्यांवर एकत्र गोळा होणारा कचरा हा ओला व सुका असा वेगळा करून घनकचरा प्रकल्पात न्यावा लागत आहेत . जेणे करून अनेक भागातील कचरा हा एक ते दोन दिवस उचलला जात नाही . परिणामी घाणीचे साम्राज्य पसरून रोगराईची भीती वाढली आहे. परंतु महापालिका मात्र ह्या बेकायदा कचरा कुंड्या बंद करून कचरा टाकणाऱ्या लोकांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देत आहेत. पालिका नागरिकांकडून घनकचरा शुल्क वसूल करत आहे मात्र घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकGarbage Disposal Issueकचरा प्रश्न