शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

राज्यभरातील कारच्या काचा फोडून टेप चोरणारी टोळी ठाण्यात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 8:27 PM

रस्त्यावर किंवा पार्र्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून कारमधील टेपची चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. मुंबई ठाण्यासह राज्यभरातील ४३ ठिकाणी अशा चो-या केल्याची कबूली या टोळीने दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचची कारवाईनामांकित कंपन्याचे साडे तीन लाखांचे १६ टेप जप्त४३ गुन्हयांची दिली कबूली

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमधील कारच्या काचा फोडून कारटेप चोरणा-या टोळीतील जगन्नाथ सरोज (४६ ) आणि दिनेश कश्यप (३३) या दोघांना जेरबंद केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी १५ आॅक्टोंंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट ५ च्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी आतापर्यंत अशा प्रकारचे ४३ गुन्हयांची कबूली दिली असून त्यांच्याकडून तीन लाख ५० हजार ७०० रुपयांचे १६ नामांकित कंपन्यांचे कारटेप जप्त करण्यात आले आहेत.गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालय परिसरात पार्र्किंगमधील वाहनांच्या काचा फोडून टेप चोरण्याचे प्रकार सर्रास वाढले होते. त्याअनुषंगाने हे गुन्हे उघड करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलिसांना दिले होते. अशा प्रकारे वाहनांमधील कारटेप चोरणारी टोळी ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि रत्नागिरी आदी जिल्हयामध्ये कार्यरत असून ती नालासोपारा भागात फिरत असून त्यांच्यातील दोघेजण ठाण्यातील घोडबंदर रोड भागात टेहळणीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे रणवरे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, अनिल सुरवसे, जमादार बाबू चव्हाण, पोलीस हवालदार विकास लोहार, देविदास जाधव, मनोज पवार आणि पोलीस नाईक कल्पना तावरे आदींच्या पथकाने सापळा लावून सरोज आणि कश्यक या दोघांनाही ११ आॅक्टोंबर रोजी अटक केली. सखोल चौकशीत त्यांनी ठाणे शहर, मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण, पुणे शहर आणि रत्नागिरी अशा वेगवेगळया ठिकाणी ४५ गुन्हयांमध्ये त्यांना यापूर्वी अटक झाली आहे. त्यांनी चितळसर, कासारवडवली, वर्तकनगर, वागळे इस्टेट, ठाणेनगर आणि नौपाडा अशा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील १४ गुन्हयांची कबूली दिली. याव्यतिरिक्त ठाणे ग्रामीण, मुंबई शहर परिसरात २९ कारटेप चोरीचे गुन्हे केल्याचीही कबूली दिली. त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांचे १६ कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून ४३ गुन्हे उघड झाले आहेत. त्यांनी चोरीसाठी वापरलेली कार तसेच स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टी पाना, लो्रखंडी पक्कड आणि एक्सा ब्लेड असा सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी