गणपतीसह नवरात्रोत्सवात ध्वनी मर्यादा राखून १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:42 PM2018-09-14T18:42:02+5:302018-09-14T18:57:48+5:30

उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देत नियमांचे पालन करीत ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यास परवानगी जारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळाना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे, आणि मजवानी कक्ष या सारक्ष्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी डीजेच्या ध्वनीची विहीत मर्यादा राखून वाजवण्यासठाणे जिल्हाप्रशासनाकडून परवानगी जारी झाली

With the Ganapati and Navratri, the sound limit will be played till 12 o'clock! | गणपतीसह नवरात्रोत्सवात ध्वनी मर्यादा राखून १२ वाजेपर्यंत वाजवा डीजे !

डीजे वाजवण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय अन्य सणासुधीच्या कालावधीतही ध्वनी मर्यादा राखून डीजे वाजवण्यासाठी मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देसकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीज वाजवण्यास परवानगी असली तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले गणपती उत्सवा दरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश दिवाळीमध्ये केवळ लक्ष्मी पूजनच्या दिवशी डीजे वाजवता येईल

ठाणे : ध्वजीप्रदूषण टाळण्यासाठी विविध अटींसह ध्वनीची विहीत मर्यादा राखून गणपतीच्या या कालावधीसह नवरात्रोत्सवात सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत डीजे वाजवण्यास जिल्हा प्रशासनाने सहमती दर्शवली आहे. याशिवाय अन्य सणासुधीच्या कालावधीतही ध्वनी मर्यादा राखून डीजे वाजवण्यासाठी मार्गदर्शन सुचानाही पोलिसांना ठाणे जिल्हाप्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयातील जनहित याचिका, पर्यावरण विभागाचे आदेश आदींचा संदर्भ देत नियमांचे पालन करीत ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवण्यास परवानगी जारी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे ध्वनीप्रदूषण होणार नसल्याची काळजी घेण्याच्या सूचना गणपती मंडळाना पोलिसांनी जारी केल्या आहेत. यामुळे डीजेचा आवाज ठिकठिकाणी मंदावलेला ऐकायला मिळत आहे. श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे, आणि मजवानी कक्ष या सारक्ष्या बंद जागाखेरीज इतर ठिकाणी डीजेच्या ध्वनीची विहीत मर्यादा राखून वाजवण्यासठाणे जिल्हाप्रशासनाकडून परवानगी जारी झाली आहे.
सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत डीज वाजवण्यास परवानगी असली तरी त्यासाठी दिवसही निश्चित केले आहेत. यामध्ये गणपती उत्सवा दरम्यान केवळ चार दिवस डीजे वाजवण्याची मुभा आहे. यामध्ये दुसरा दिवस, पाचा दिवस, गौरी विसर्जन आणि अनंत चतुर्दशी आदी दिवशी डीजे वाजवता येणार आहे. गणपती संपल्यानंतर येणाऱ्या नवरात्रोत्सवातीलही काही दिवस डीजे वाजवण्यासाठी निश्चित केले आहेत. यामध्ये अष्टमी व नवमी या दोन दिवसांचा समावेश आहे. दिवाळीमध्ये केवळ लक्ष्मी पूजनच्या दिवशी डीजे वाजवता येईल. तर ख्रिसमसला एक दिवस आणि ३१ डिसेंबरला केवळ एक दिवस डीजे वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे.
सध्याच्या या सणा सुधीच्या दिवसाप्रमाणेच वर्षभरात येणा-या सणांसाठी देखील डीजेचल ध्वनी मर्यादा राखण्याचे सूचित केले आहेत. यामध्ये शिवजयंती, ईद ए मिलाद, डॉ. आंबेडकर जयंती, १ मे  महाराष्ट्र दिन आदी दिवशी देखील ध्वनीची मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. यासाठी देखील सकाळी ६ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंतच ध्वनी मर्यादा राखून डीजे वाजवता येणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त अतिरेक करून ध्वनीप्रदूषण करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हा प्रशासनाने पोलिसाना दिले आहेत. यास अनुसरून सध्या सुरू असलेल्या या गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनीप्रदूषण होणार नाही, याची काळजी पोलिसांसह गणेश मंडळांकडून घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: With the Ganapati and Navratri, the sound limit will be played till 12 o'clock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.