गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार -शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 01:11 IST2020-01-11T01:11:35+5:302020-01-11T01:11:46+5:30

गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुरुवारी दिली.

Gadchiroli destroys Naxalism completely - Shinde | गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार -शिंदे

गडचिरोलीतील नक्षलवाद समूळ नष्ट करणार -शिंदे

ठाणे : ठाणेकरांच्या आशीर्वादामुळेच नगरविकासमंत्री बनल्याने ठाण्याचा विकास तर साध्य करूच, शिवाय गडचिरोली भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्यासाठीही प्रयत्न करण्याची ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात गुरुवारी दिली. ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते बोलत होते.
ज्ञानपीठ एज्युकेशन सोसायटी, ठाणे संचालित ज्ञानपीठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन तसेच पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र माला शिंदे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्षात शिक्षण, क्र ीडा व इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना ठाणे उपजिल्हाप्रमुख व माण तालुका संपर्कप्रमुख शंकर वीरकर, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, नगरसेवक भूषण भोईर, रोटरी क्लब आॅफ ठाणे अच्युत दामले, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब दगडे, मुख्याध्यापक प्रभाकर पाटील, मुख्याध्यापिका माधुरी ढवळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. ठाणेकर जनता व पक्षश्रेष्ठी यांच्या आशीर्वादामुळे शिवसेनेचा सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुख ते राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. तसेच, ठाणेकरांच्याच आशीर्वादामुळे ७० टक्के नागरिकांशी निगडित असलेल्या आणि आधी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकाससारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. ठाणे जिल्ह्याबरोबर नक्षलवादी क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनदेखील जबाबदारी मिळाली आहे.
जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. या सरकारमध्ये मिळालेल्या जबाबदाºया निष्ठेने पार पाडत ठाणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा विकास करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला. दरम्यान, गोरगरीब मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्ञानपीठसारखी संस्था काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Gadchiroli destroys Naxalism completely - Shinde